shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विवाहितेच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेपजिल्हा न्यायालयाचा निर्णय : चंद्रकांता तळेकर खून प्रकरण

पूर्णा । वार्ताहर :-
जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथील सौ. चंद्रकांता अनिल तळेकर या विवाहितेच्या खून प्रकरणात तीचे पती अनिल दत्तात्रय तळेकर यास जिल्हा न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी शुक्रवारी (दि. ४ मार्च) दोषी ठरवून जन्मठेप सुनावली. तसेच १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन वर्ष कैद, अशीही शिक्षा सूनावली.
परभणी तालुक्यातील आर्वी येथील कैलास रंगनाथ रणेर यांनी जिंतूर पोलिस ठाण्यात एक तक्रार दाखल केली.
 त्याद्वारे आपली मुलगी चंद्रकांता हीचे पाचेगाव येथील अनिल तळेकर यांच्याबरोबर विवाह करुन दिला होता.

विवाहानंतर दोन मुले झाली. त्यानंतर जावई अनिल तळेकर, वडील दत्ता तळेकर, आई निलाबाई तळेकर हे माहेरहून हळद शिजविण्याच्या कुक्कर खरेदी करीता १ लाख रुपये आण म्हणून आपल्या मुलीस मानसिक व शारिरीक त्रास देत होते, असे नमूद केले. २५ मे २०२० रोजी आपली मुलगी चंद्रकांता ही सासरी असतांना मृत्यू पावली. परंतु, जावई अनिल याने तीला चक्कर आली, अशी अफवा उडवून तीला जिंतूर येथील सरकारी दवाखान्यात घेवून गेलेे, त्यावेळी तीची मावशी छायाबाई ससे याही जीपमध्ये होत्या. त्यांनी चंद्रकांताचे शरीर तपासून पाहिले असता तीच्या सासू-सासर्याने चंद्रकांताच्या गळ्याभोवती असणारा रुमाल काढू दिला नाही. 

दवाखाना आल्यावर हजर असणार्या महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल लीला जोगदंड यांनी चंद्रकांताचे शरीर पाहून तीला गळा दाबून मारले असावे, अशी शंका उपिस्थत केली. वैद्यकीय अधिकार्यांना या महिला पोलिस कर्मचार्याने तात्काळ शवविच्छेदन करण्याची विनंती केली. वैद्यकीय अधिकार्यांनी चंद्रकांता यांचा मृत्यू हा गळा दाबूनच झाला असल्याचा अंतरिम अहवाल दिला, असे फिर्यादी रणेर यांनी नमूद केले.

दरम्यान, जिंतूर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करीत पुढे चौकशी केली अन् सहाय्यक पोलिस निरीक्षक अभय दंडगव्हाळ यांनी या गुन्ह्याचा तपास करीत आरोपी विरुध्द सबळ पुरावा एकत्र करुन तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात जिल्हा न्यायालयात सरकार पक्षातर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाचे प्रमुख सरकारी वकील ऍड. ज्ञानोबा दराडे यांनी बाजू मांडली. त्यामध्ये महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल लीला जोगदंड व शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकारी संतोषकुमार चव्हाण यांची साक्ष महत्वाची ठरली. शवविच्छेदन अहवालात मयताचा मृत्यू हाताने गळा दाबल्यामुळेच झाला, असा पुरावा आला. तसेच मयत चंद्रकांता हीचा मृत्यू रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान झाला, हे सिध्द झाले. त्यावेळी मयत चंद्रकांता ही आरोपी अनिल तळेकर यांच्याच एकमेव ताब्यात होती. तीचा मृत्यू कसा झाला, हे सांगण्याची जबाबदारी आरोपीवर होती, परंतु आरोपी तळेकर याने त्याचे स्पष्टीकरण दिले नाही, न्यायालयाने हे गृहीत धरले की, सरकारी पक्षाने परिस्थितीजन्य पुराव्याची साखळी जोडली, मयत चंद्रकांता हीचा मृत्यू गळा दाबल्यानेच झाला व ती ज्यावेळी मयत झाली त्यावेळी ती आरोपी अनिल तळेकर यांच्या ताब्यात होती.

या प्रकरणात प्रमुख सरकारी वकील ऍड. ज्ञानोबा दराडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पोलिस अधिक्षक जयंत मीना, अप्पर पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक कपील शेळके, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनील चव्हाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी भांगे, पोलिस शिपाई प्रमोद सूर्यवंशी यांनी काम पाहिले.
close