shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा त्रिधारा पाटीवर रास्ता रोको


पूर्णा । वार्ताहर :-
 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज शुक्रवारी (दि.४) त्रिधारा पाटीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. एक तास राज्य महामार्ग २२२ शेतकर्‍यांनी अडऊन धरला. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना शेतीला दिवसा विज मिळावी या मागणीसाठी राजु शेट्टी हे गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर येथे धरणे आंदोलनास बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणुन आज संपुर्ण महाराष्ट्रात चक्का जामची हाक दिली होती.

परभणी जिल्ह्यात त्रिधारा पाटी वसमत रोड आणि जलालपुर पाटी जिंतुर रोड, गंगाखेड तालुक्यात दत्त मंदिर नांदेड रोड तर मानवत तालुक्यातील मंगरुळ पाटी पाथरी रोड हे प्रमुख राज्य मार्ग अडवण्यात आले. या वेळेस जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, गजानन तुरे, भगवान शिंदे, भास्कर खटिग, शेख जाफर, केशव आरमळ, जयवंत कुंडगिर, बाळासाहेब टेकाळे, रामप्रसाद गमे, दिगंबर पवार, प्रसाद गरुड, रामकिशन गरुड, नारायण गरुड,  गजानन खटिंग, सुशील रसाळ यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close