शिक्षक भारती संघटनेची मागणी..!
राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. ४-३-२०२२
अहमदनगर जिल्ह्यात सध्याच्या परिस्थितीत उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यातील शाळा सकाळ सत्रात कराव्यात अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, राज्य सचिव सुनील गाडगे, उच्च माध्यमिक विभागाचे सचिव महेश पाडेकर यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे कार्यालयीन अधीक्षक सत्यजित मच्छिंद्र यांना निवेदन दिले तसेच माध्यमिक ,उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात सहविचार सभा आयोजित करावी अशी मागणी देखील केली आहे.
या मागणीस, उपाध्यक्ष रामराव काळे,सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, महिला राज्याध्यक्ष रूपाली कुरुमकर,अमोल चंदनशिवे,माफीज इनामदार,कैलास रहाणे, अमोल वरपे, रूपाली बोरुडे, सचिन लगड, संपत वाळके,गणपत धुमाळ,श्याम जगताप, संजय तमनर, सोमनाथ बोनंतले, ज्ञानेश्वर काळे, गोवर्धन रोडे,प्रवीण मते,हर्षल खंडीझोड,दादासाहेब कदम, संतोष निमसे, दत्तात्रय घुले,संजय पवार,राजेंद्र जाधव,सुदाम दिघे,संभाजी पवार, संतोष शेंदूरकर,कैलास जाधव,हनुमंत रायकर,नवनाथ घोरपडे,किसन सोनवणे,सिकंदर शेख,सुदर्शन ढगे, संतोष देशमुख आदी पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला.

