कळाशी येथील वि. का. सेवा सोसायटीचे श्री. काळभैरवनाथ पॅनेलचा दणदणीत विजय
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कळाशी सोसायटीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व - राजेंद्र गोलांडे.
इंदापूर प्रतिनिधी:कळाशी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या काळभैरवनाथ पॅनेलचा एकहाती विजय झाला आहे. निवडणुकीत सोसायटीवर राष्ट्रवादीच्या पॅनेलने एकहाती सत्ता मिळवली आहे.यानिमित्ताने कळाशी गावांमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाल्याचे राजेंद्र गोलांडे यांनी स्पष्ट केलेआहे.
या विषयी बोलताना पुणे जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक राजेंद्र गोलांडे यांनी सांगितले की, कळाशी हे गाव पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचे असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून या गावाला कोट्यावधी रुपयांचा निधी मिळत आहे, तसेच प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी ना .भरणे स्वतः जातीने लक्ष घालून सातत्याने मदत करत आहेत.त्यामुळे विरोधकांनी या निवडणुकीमध्ये प्रचंड ताकद लावूनही सभासदांनी आमच्या पॅनेलवर विश्वास ठेवल्यामुळे सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने निवडून आलेले आहेत.या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमचे पॅनल निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. तसेच सभासदांनी टाकलेल्या विश्वासास कुठेही तडा जाऊ न देता सभासद हित जोपासत संस्थेचा नावलौकिक वाढवण्याचा दृढ निश्चय राजेंद्र गोलांडे यांनी व्यक्त केला.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे:
सर्वसाधारण मतदारसंघ-कोंडीबा रामा करे, सहदेव विठ्ठल करे, विलास नानासो गोलांडे, पृथ्वीराज रघुनाथ चव्हाण, हनुमंत जनार्दन बाबर,मोहन रामचंद्र भोई,शानुर जाफर शेख, अविनाश देविदास सूर्यवंशी
अनुसूचित जाती-जमाती मतदार संघ-अंकुश जनार्धन शिंदे
महिला राखीव मतदारसंघ-सुरेखा तुकाराम गोलांडे,कांचन चंद्रकांत देवकर
इतर मागासवर्गीय मतदारसंघ-दादासो हरिदास भालेकर
भटक्या जाती-जमाती मतदार संघ-दत्तात्रय अंबादास रेडके.

