shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांनी रियाज मुलाणीच्या धाडसाचे केले कौतुक

हर्षवर्धन पाटील यांनी रियाज मुलाणीच्या धाडसाचे केले कौतुक.
इंदापूर प्रतिनिधी:  रियाज मुलाणी या युवकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ज्येष्ठ दाम्पत्याचे प्राण वाचले. गाडीचे ब्रेक निकामी झाल्यामुळे दुचाकी अत्यंत वेगाने धावत होती परंतु रियाजच्या प्रसंगावधानामुळे दोघांचे प्राण वाचले. आज राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी रियाज मुलाणी या युवकाचा सत्कार करत त्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले.
     लासुर्णे ता. इंदापूर येथे काल ब्रेक फेल झाल्यामुळे ज्येष्ठ दाम्पत्यांची दुचाकी गाडी बंद करता येत नव्हती परंतु रियाज याने धाडसाने ही गाडी पकडून ठेवली आणि थांबवली त्यामुळेच ज्येष्ठ नागरिकांचे प्राण वाचू शकले. रियाच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रियाजने दाखविलेल्या धाडसाचे कौतुक करत त्याचा सन्मान केला.
close