shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी..!

पूर्णा/वार्ताहर
राज्य शासनाने बुधवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत परभणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी दिली आहे. 

या महाविद्यालयासाठी राज्य शासनाने ६८२ कोटी रुपयांचा निधी मंजुर केला आहे. सर्व परभणीकरांच्या मागणीला यश आले आहे. हा जनआंदोलनाचा विजय आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा आमचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता परभणीकरांना उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या जातील अशी प्रतिक्रिया परभणीचे खासदार संजय जाधव यांनी दिली आहे.

गेल्या अनेक वर्षापासूनची परभणीकरांच्या हक्काची मागणी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राज्य शासनाने बुधवारी (दि. दोन) अखेर मंजुरी दिली आहे. परभणीकरांच्या जनआंदोलनाचे हे मोठे यश मानले जात आहे. परभणी जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे यासाठी परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळ्या टप्प्यात जनआंदोलन करण्यात आले होते. सुरुवातीच्या टप्प्यात सर्वसामान्य नागरीक, विद्यार्थी, महिला, डॉक्टर, वकील यांनी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो विद्यार्थांचा मोर्चा ही काढण्यात आला होता. त्यानंतर खासदार संजय जाधव यांच्या मुख्य नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी सलग आठ दिवस धरणे आंदोलन केले होते. त्यामुळे खासदार संजय जाधव यांनी प्राणांतिक उपोषणाचा ईशारा दिला होता. परंतू, त्याच वेळी दि. १ मे रोजीमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मराठवाडा दौर्‍यावर असतांना परभणी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली होती. त्यामुळे परत परभणीकरांच्या आशा उंचावल्या होत्या. त्यानंतर शासकीय स्तरावरून मोठ्या प्रमाणात हालचाली झाल्या. एका उच्चस्तरीय समितीनेही शासकीय रुग्णालायाच्या उभारणी संदर्भात परभणी येथे भेट देवून पाहणी केली होती. अखेर बुधवारी (दि. २) परभणीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मंजुरी देण्याच निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. 

close