पूर्णा । वार्ताहर :-
परभणी जिल्ह्यात ग्रामीण भागात अजूनही बालविवाह होण्याचे प्रमाण जास्त आहे आरोग्याचा विचार करता हा प्रकार अधिक घातक आहे त्यामुळे समाजाने पुढे येऊन जबाबदारी घेत मुलीचे कमी वयात होणारे विवाह रोखणे गरजेचे आहे ही लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे असे मत जिल्हाधिकारी अंचाल गोयल यांनी व्यक्त केले आहे.
परभणी येथे २ मार्च रोजी सायकळी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी केरवाडी यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या चाईल्ड लाईन ने बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत या कामासाठी पुढाकार घेतलेल्या ग्रामसेवक, आंगणवाडी कार्यकर्ती, पोलिस आदी कर्मचारी वर्गाचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हाधिकारी अंचाल गोयल या बोलत होत्या.
यावेळी स्वप्नभूमीचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी, महीला व बालविकास उप मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, माणिक ताई कुलकर्णी, अजिंक्य कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी डी. आर. सारंग, प्रलाद पांचाळ, गंगा माने, संदीप बेंडसुरे, पापा शेख, सुकेशिनी चौधरी आदींची उपस्थिती होती
यावेळी प्रत्येक तालुक्यातून बालविवाह रोखण्यासाठी गाव पातळीवर काम करणार्यांचा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे.
चाइल्ड लाईन ने काम केल्याने मागील वर्षभरात ११८ बालविवाह रोखण्यात यश मिळवले आहे कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व तालुका प्रकल्प अधिकारी चाईल्ड लाईनचे संदीप बेंडसुरे, अनंता सोगे, कृष्णा फुलारी,सुशील गोरे, भरत ढगे, सविता जमधाडे,योगेश्वरी शेवाळकर, कविता कुलकर्णी, दत्ता पुंड कार्यकर्तेनीलिमा कोकड,तेजस्विनी कांबळे, अर्चना दुधाटे, राधा कदम, दिपाली अभोरे आदींनी परिश्रम घेतले.

