shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पारधी समाजाच्या युवकाला व त्याच्या वडिलांना मारहाण :केजमधिल एका युवका विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल..!!


-------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :- 
केज येथे एका पारधी समाजातील युवकाला व त्याच्या वडिलांना एकाने जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. २३ मार्च बुधवार रोजी दुपारी २:०० वा. अनिल व त्याचे वडील शाहू पवार रा साळेगाव ता. केज हे दोघे केज येथील कानडी माळी चौकात बाजार करून त्यांच्या गावाकडे जात असताना शंभू दिलीप पाटील यांनी त्यांच्या पाठी मागून येऊन अनिल पवार यांच्या गच्चीला घरले आणि म्हणाला की, आपले पाठीमागील प्रकरण मिटले. आता हे प्रकरण तुला सोपे जाईल का ? असे म्हणून त्याने चापटाने मारहान केली. त्यावेळीतेथे बरेच लोक जमले होते. हे भांडण सोडविण्यासाठी अनिल पवार यांचे वडील शाहू पवार आले असता त्यांनाही उजवे बाजुचे फासळ्यावर लाथाने मारहाण केली. कानडी माळी चौकात जातीवाचक व अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांचा आमचा अपमान केला. तसेच नादी लागलात तर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.

या प्रकरणी अनिल पवार यांच्या फिर्यादी वरून शंभू दिलीप पाटील यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात दि. २४ मार्च रोजी गु.र.नं. ८९ /२०२२ भा.दं.वि. ३२३, ५०६ ल(१) (एस), ३ (२) (व्ही ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकणाचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे करीत आहेत.
close