नगर प्रतिनिधी
सविस्तर माहिती अशी की,नगर शिर्डी हायवे लगतच शिंगवे नाईक हे गाव आहे.शिंगवे नाईक तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथे प्राचीन काळातील सन 1664 या सालातील भव्य दिव्य असे दगडात कोरीव हात कामा पासून तयार श्रीराम मंदिर देवस्थान आहे.11 एप्रिल 2022 ला श्रीराम नवमी उत्सव आहे. विशेष बाब म्हणजे या मंदिराला तब्बल दोनशे पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.यामिताने उत्सवासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट. शिंगवे नाईक, व समस्त ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आलेले आहे.त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच दररोज रात्री 9 ते 11 मधुर वाणी मध्ये कीर्तनाचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आलेला आहे...
श्रीराम नवमी ला देखील भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे.तरी पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांनी श्रीराम नवमी उत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.अशी ही नम्रतेची विनंती श्रीराम देवस्थान ट्रस्ट.व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आली आहे...
नववर्षाच्या व श्रीराम नवमीच्या सर्व भावीक भक्तांना श्रीराम देवस्थान ट्रस्ट व संपूर्ण विश्वस्त मंडळ यांच्या कडून खूप खूप मंगलमय शुभेच्छा...!

