shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कु.सफिया शेख हिचा रमजानचा पहिला रोजा (उपवास) पूर्ण

राहुरी (प्रतिनिधी) - तालुक्यातील वरवंडी येथील दैनिक हिंदुसम्राटचे राहुरी तालुका प्रतिनिधी,पत्रकार जावेद चाँद शेख यांची ९ वर्षीय कन्या कु.सफिया या चिमुकलीने माहे रमजान अशा या पवित्र महिन्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.कडक उन्हाळयात जिवाची लाही लाही होत असताना,अशा अवघड परिस्थितीतही माहे रमजानमध्ये पहाटे पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अन्न, पाणी न घेता जवळपास अखंड चौदा तासांचा रोजा (उपवास) पूर्ण केला आहे.

 इस्लाम धर्मात पाच तत्वांपैकी रोजा याला विशेष महत्त्व आहे, दिवसभरात थुंकीही न गिळता पवित्र असा रोजा मुस्लिम बांधव पुर्ण करतात,असा कडक रोजा (उपवास) कु.सफिया जावेद शेख हिनी पुर्ण केला असून पहिला रोजा सोडताना इफ्ताच्या वेळी (उपवास सोडताना) तिला मिठाई देऊन फुलांचा हार घालण्यात आला होता,एवढया लहान वयातच तिने रमजानचा पहिला उपवास केल्याने तिचे  नातेवाईकांकडून सर्वत्र कौतुक केले जात आहे.
close