shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिवमल्हार वाघ्या मुरळी व गोंधळी सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी विशाल शिरसाठ,तर महिलाध्यक्षपदी सुमनबाई पवार यांची निवड..!

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - तालुक्यातील मौजे वांगी खुर्द येथे नुकतेच शिवमल्हार वाघ्या  मुरळी व गोंधळी सेवाभावी संस्थेचे  वार्षिक अधिवेशन पार पडले, यामध्ये संस्थेच्या माध्यमातून गत वर्षभरात करण्यात आलेल्या विविध समाजाभिमुख विधायक कार्यांचा लेखाजोखा मांडण्यात आला,सामाजात हिरिरिने भाग घेणाऱ्या समाजसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करुन गौरविण्यात आले.

याप्रसंगी विशाल शिरसाठ यांची संस्थेच्या अध्यक्षपदी तर सुमनबाई पवार यांची महिलाध्यक्षपदी निवड करण्यात आली, या प्रसंगी विशाल शिरसाठ म्हणाले की, संस्थेने जी माझ्यावर जबाबदारी सोपवली आहे ती  पुर्ण करण्यास मी कधीही मागे सरणार नाही तसेच संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यास कशी अधिकाधिक गती देता येईल यासाठी मी नेहमी प्रयत्नशील असेल अशीही याप्रसंगी त्यांनी ग्वाही दिली.

यावेळी श्री श्री परमपूज्य जगद्गुरु अरुणनाथगिरीजी महाराज, मा.राज्यमंत्री तथा रासपा नेते श्री.बाळासाहेब दोडतले, श्रीरामपूर पंचायत समितीचे मा.सभापती दीपकअण्णा पठारे, ह.भ.प.चोरमले महाराज शास्त्री, रासपा शेतकरी आघाडीचे उपजिल्हाध्यक्ष नानासाहेब जगताप, रासपा उत्तर प्रभारी शरदभाऊ बाचकर,उत्तर अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष सय्यद बाबा शेख, रासपा ज्येष्ठ नेते वाल्मिक दादा भोकरे,रासपा जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे,रासपा उपजिल्हाध्यक्ष दत्तात्रय कचरे,रासपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई जराड, रासपा राहुरी तालुकाध्यक्ष रेखाताई नरवडे,रासपा शहराध्यक्ष सचिन लाटे,वांगी खुर्द सरपंच काकासाहेब साळे,संस्थापक अध्यक्ष गोरक्षनाथ येळे, सचिव नंदकुमार खेमनर,महिला अध्यक्ष सुमनबाई पवार, सरचिटणीस चंद्रकांत थोरात, चिटणीस शिवाजी गायकवाड, अहमदनगर जिल्हाध्यक्ष बबनराव पुंड, नाशिक जिल्हाध्यक्ष छबुराव शिंदे,कार्याध्यक्ष आशाताई गायकवाड, सरचिटणीस सुशिलाबाई गायकवाड, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष दत्तात्रय निकम,उप जिल्हाध्यक्ष जितु लकडे,राहाता महिलाध्यक्ष लताताई महानोर,तालुका उपाध्यक्ष ताई कदम, पाथर्डी तालुकाध्यक्ष अजिनाथ रोमन, राहुरी सरचिटणीस मुरलीधर पेरणे,उपजिल्हाध्यक्ष भीमराज गायकवाड, महिला संघटक तनिष्का कुमारी, राहुरी तालुकाध्यक्ष गोरख मोरे, राहाता महिला संघटक मिनू, उत्तर नगर सचिव भारत सोनवणे, तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब भालेराव, प्रकाश बावस्कर,दादासाहेब कुसेकर,राहाता तालुकाध्यक्ष मनोजकुमार आदी मान्यवर उपस्थित होते.
close