महसुल प्रशासनाकडून महिलेस
शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा
महसुल प्रशासनाचे धन्यवाद
श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :- गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून माजी सैनिक पत्नी श्रीमती, पार्वताबाई देसाई रा.नायगाव नाऊर यांच्या शेतात जाणाऱ्या रस्त्याचा वाद होता त्यांनी त्रिदल सैनिक सेवा संघ शाखा श्रीरामपूर यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली आणि त्याच कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनाने अमृत जवान सन्मान अभियान २०२२ सुरू केली,त्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार यांचेकडे सैनिक सेवा संघाने तात्काळ तक्रार दाखल केली,त्यावर त्यांनी या तक्रारीची त्वरित दखल घेत या रस्ता केस बाबत आदेश पारित करून पोलिस बंदोबस्तात माजी सैनिकाच्या विधवा पत्नीस खऱ्या अर्थाने न्याय देऊन देशाप्रती व त्रिदल माजी सैनिकांवर असलेले प्रेम दाखवले आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याचा ठसा उमटविला आहे.
याअगोदरही सन २०२१ साली सामान्य नागरिकांची जाण असलेल्या तहसीलदार साहेबांना मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी आदर्श तहसीलदार म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे, वेळोवेळी सैनिक संघटनेच्या माध्यमातून माजी सैनिकांना केलेल्या अनेक मदती बाबत त्रिदल सैनिक सेवा संघाचे अहमदनगर उत्तरचे उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार, तालुका अध्यक्ष अनिल लगड ,उपाध्यक्ष संग्राम यादव, महिला अध्यक्ष छायाताई मोटे,बाळासाहेब लोखंडे,अमित देशमुख,सुनील भालेराव,संतोष देवराय,रवींद्र कुलकर्णी,विलास जगताप,अन्वर शेख,तांबे मेजर,गवळी सुनील, गव्हाणे मेजर,विलास खर्डे,राम म्हैस,प्रदिप विटकरे,मंगेश यादव,राम पुजारी आदींनी कर्तबगार तहसीलदार आणि महसुल प्रशासनाचे आभार व्यक्त करत धन्यवाद दिले आहेत.

