shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नीरा भीमा कारखान्याचे मंगळवारी 5 ठिकाणी शेतकरी संवाद अभियान - हर्षवर्धन पाटील साधणार संवाद

नीरा भीमा कारखान्याचे मंगळवारी 5 ठिकाणी शेतकरी संवाद अभियान 
  - हर्षवर्धन पाटील साधणार संवाद 
इंदापूर: प्रतिनिधी दि.4/4/2022
         शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रामध्ये 5 ठिकाणी  ' नीरा-भीमा संवाद अभियान ' या उपक्रमाचे आयोजन मंगळवारी (दि.5) करण्यात आले आहे. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे अभियानामध्ये मार्गदर्शन करणार असून कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत. तरी या नीरा-भीमा संवाद अभियानास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे व प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील यांनी केले आहे.
              या नीरा-भीमा संवाद अभियानाच्या मेळाव्यांची ठिकाणे पुढीलप्रमाणे 1) गिरवी :- मारुती मंदिरा शेजारी, ग्रामपंचायत कार्यालयासमोर - सकाळी 9 वा.  2) शेटफळपाटी :- आशिर्वाद मंगल कार्यालय - सकाळी 11 वा.  3) निमसाखर :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर - सायंकाळी 4 वा.  4) लाखेवाडी :- ग्रामपंचायत कार्यालयासमोर - सायंकाळी 5 वा.  5) पिटकेश्वर :-  श्री महादेव मंदिर - रात्री 7 वा.
        या संवाद अभियानास ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूकदार यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जमादार उपस्थित होते.

close