राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. ४-४-२०२२
वाळकी:- वाळकीच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्यापरिवर्तन पॅनलची प्रचारास सुरुवात झाली असून मतदान शुक्रवार दि. १५/०४/२०२२ रोजी सकाळी ८.०० ते ४.०० या वेळेत न्यु इंग्लिश स्कुल, वाळकी या ठिकाणी होणार आहे . या परिवर्तन पॅनलचे कपबशी हे चिन्ह आहे .
यातील उमेदवार कासार अनिल अदिनाथ,कासार अरुण नारायण,कासार सतिष मोहन,धोंडे बाळासाहेब निवृत्ती 'बोठे अरुन बबन,भालसिंग आप्पासाहेब बाबासाहेब , भालसिंग अंबादास आप्पासाहेब , भालसिंग रामदास बबन,साठे सर्जेराव लक्ष्मण, सौ. कासार अर्चना योगेश, सौ. बोटे शेवंताबाई साहेबराव, मंडलिक विलास कारभारी , झोंड दिलीप पाराजी हे आहेत.
परिवर्तन पॅनलचे रामदास भालसिंग यांनी विरोधकांवर यावेळी हल्लाबोल चढविला .
त्यांनी सांगितले की ,
धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची ही लढाई आहे . सर्वांनी मिळून गावासाठी एक विचाराने स्थापन केलेला परिवर्तन पॅनल आहे . याचे उद्दिष्ट एकच आहे ते म्हणजे परिवर्तन . पस्तीस वर्षांमध्ये सोसायटीत एकाच माणसाची सत्ता राहिली . मागील ३५ वर्षांची सोसायटीची आम्ही दोन महिन्यांपूर्वी माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती .परंतु माहितीचा अधिकार पायदळी तुडवत आम्हाला माहिती दिली गेली नाही . सोसायटीत सात ते आठ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे तो जनतेसमोर येणे गरजेचे आहे .तसेच आमच्या सोळा उमेदवारांनी परिवर्तन पॅनलला एकमताने पाठिंबा दिलेला आहे .यांच्यात कोणताही मतभेद नाही . विरोधकांकडून या उमेदवारांमध्ये मतभेद करण्याचा प्रयत्न होत आहे . उमेदवारांना दमदाटी करून, धमकावून त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्यांना सोडणार नाही प्रसंगी कायद्याने त्यांना उत्तर देऊ .
भालसिंग पुढे म्हणाले की , वाळकी गावच्या सभासदांच्या वतीने मी सांगू इच्छितो की हे जे १६ उमेदवार आहेत यांच्यामध्ये जर कोणी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही जशास तसं उत्तर देऊ . ३५ वर्षांची कारकीर्द हातातून जात असल्यामुळे विरोधक सैरभैर झालेले आहेत . उमेदवारांना तसेच मला स्वतःलाही त्यांनी दमदाटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे . आम्ही त्यांना अजिबात घाबरत नाही . गावातील प्रमुख व्यक्तींचा या परिवर्तन पॅनलला संपूर्ण पाठिंबा आहे .
निवडणूक शांततेने पार पाडण्यासाठी एसपी साहेबांना ही येत्या दोन-तीन दिवसात निवेदन देण्यात येणार असल्याचे भालसिंग यांनी सांगितले . गावाचे नाव कुठेही खराब होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत .हा परिवर्तन पॅनल गावाच्या आणि शेतकर्यांच्या हितासाठी आम्ही तयार केला आहे . सोसायटीला विविध मार्गाने उत्पन्न मिळत आहे . विरोधक ३५ वर्षांपासून ही संस्था चालवत आहेत . त्यांच्या दबावाला बळी पडून माहितीच्या अधिकारात कोणतीही माहिती दिली जात नाही . सत्तेच्या दबावातून विरोधक निवडणुकीत जिंकू पाहात आहेत आणि ते आम्ही होऊ देणार नाही .
साधारण नऊ मुद्द्यांवर माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली असता त्यातील डाळिंबाचे शेअर्स कापले जातात ,संत्र्याचे शेअर्स कापले जातात, इमारत निधी शंभर रुपये कट केला जातो.
प्रकरणे नवी-जुनी करताना प्रत्येक सभासदाचे दोनशे रुपये कट केले जातात, गाईच्या प्रकरणाचे पाच हजार रुपये कट केले जातात
हे सर्व पैसे जेडीसीसी बँकेत जमा आहेत परंतु सभासदाच्या नावावर पैसे दिसून येत नाहीत .
यावेळी भालसिंग म्हणाले की, वाळकीच्या सभासदांना मतदारांना कळकळीचे नम्र आवाहन आहे की, पहिली संस्था राजाराम धोंडीबा कासार यांच्याकडे होती त्यांनी या लोकांना डिव्हिडंड सुद्धा वाटलेला होता . त्यानंतर मात्र ३५ वर्षांमध्ये संस्थेमार्फत डिव्हीडंट सभासदांना वाटण्यात आलेला नाही . ही संस्था जर वाचवायची असेल तर आता परिवर्तन होणे खूप गरजेचे असुन मतदारांनी परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून आणले पाहिजे . हे मतदारांच्या हातात आहे . आमचा लढा यापुढेही एकजुटीने असाच चालू राहणार आहे .
यावेळी उपस्थित दिलीप भालसिंग , विशाल बोठे तसेच
भालसिंग ज्ञानदेव भिवा ,
जगताप नानासाहेब ज्ञानदेव ,
कासार अंकुश ज्ञानदेव, कासार बाबासाहेब बापू , दळवी मधुकर पंढरीनाथ , धोत्रे गोरख , घोडके गणपत नाना, जंदरे गंगाधर पांडुरंग, जुंदरे सुरेश रामभाऊ ,गांगर्डे रामदास तुकाराम,भालसिंग सुदाम गणपत, तावरे आप्पासाहेब बबन, बोठे बाळू रघूनाथ, खरपुडे आशाबाई बाबासाहेब ,
भालसिंग सुधाराणी रामदास, कासार शोभा भास्कर या सर्व १६ जणांनी परिवर्तन पॅनलच्या कपबशी हे चिन्ह असणाऱ्या उमेदवारांना जाहीर पाठींबा दिला आहे.
मा . आमदार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची आम्ही भेट घेतली आहे . निवडणूक होण्याअगोदर जर सोसायटी संदर्भात सविस्तर माहिती मिळाली नाही तर आम्ही मंत्री महोदयांना पुन्हा भेटणार आहोत आणि सांगणार आहोत की गावच्या एका सोसायटीमध्ये एवढा भ्रष्टाचार असेल तर इतर अनेक सोसायट्या आहेत त्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असू शकतो .सक्षम प्रणाली असतानासुद्धा विरोधक कायद्याला जुमानत नाहीत. हे लोकांना माहिती झाले पाहिजे .

