shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नीरा भीमा कारखान्याच्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता- कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप पूर्ण- विक्रमी 7 लाख 17 हजार में. टनाचे गाळप

नीरा भीमा कारखान्याच्या गळीत हंगामाची यशस्वी सांगता
- कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप पूर्ण
- विक्रमी 7 लाख 17 हजार में. टनाचे गाळप
फोटो:- शहाजीनगर येथे नीरा भीमा साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगता कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अध्यक्ष लालासाहेब पवार.
पुढारी: पुढारी वृत्तसेवा दि.9/4/2022
      शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चालु हंगाम सन 2021-22 च्या 21 व्या यशस्वी गळीत हंगामाची  सांगता शनिवारी (दि.9 ) गव्हाण पूजन करून उत्साही वातावरणात करण्यात आली. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली कारखान्याने कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप वेळेवर पूर्ण केले आहे. चालु गळीत हंगामात कारखान्याने  7 लाख 17 हजार में. टन ऊसाचे गाळप करुन कारखान्याच्या इतिहासामध्ये विक्रमी कामगिरी केली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी दिली. 
       यावेळी गव्हाण पूजन कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, उदयसिंह पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष लालासाहेब पवार बोलत होते. राज्यामध्ये प्रतिदिनी 3500 में.टन गाळप क्षमता असणाऱ्या  साखर कारखान्यामध्ये नीरा भीमा कारखान्याने ऊस गाळप व उपपदार्थ निर्मितीमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत राज्यामध्ये नावलौकिक प्राप्त केला आहे. चालु गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, कर्मचारी, हितचिंतक आदी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पुढील गळीत हंगामामध्ये 8 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असेही याप्रसंगी अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी नमूद केले 
      यावेळी कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील यांनी भाषणात कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमात हंगामामध्ये सर्वाधिक ऊस तोडणी वाहतूक करणाऱ्या पहिल्या तीन क्रमांकाच्या ट्रक, ट्रॅक्टर व बजाट चालकांचा सत्कार करण्यात आला.
  प्रास्ताविक शेतकी अधिकारी डी. एम. लिंबोरे यांनी केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तू सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जमादार उपस्थित होते. आभार प्र.कार्यकारी संचालक सुधीर गेंगे पाटील यांनी मानले.
___________________________

close