shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वाढदिवसाचा इतर खर्च टाळून यापुढे सामाजिक उपक्रम करून लहान मुलांबरोबर आनंद उत्सव साजरा करत वाढदिवस करावा - अनिल पवार .

वाढदिवसाचा इतर खर्च टाळून यापुढे  सामाजिक उपक्रम करून लहान मुलांबरोबर आनंद उत्सव साजरा करत वाढदिवस  करावा  - अनिल पवार .

रोहिदास पवार यांचा  अभिष्टचिंतन दिन मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व फळे वाटप करून साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथील रोहिदास गेणा पवार यांचा त्रेचाळीसावा अभिष्टचिंतन दिन आज इंदापूर येथील मूकबधिर शाळेमध्ये सामाजिक उपक्रमातून खाऊ व फळे वाटप करून तसेच केक कापून साजरा करण्यात आला.
यावेळी आमचे मेंबर मित्र परिवारचे अनिल पवार, पिंटूसेठ घोडके, अनिल चौगुले, पिंटूसेठ म्हसवडकर ,दुर्गा शिंदे तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी शुभेच्छा देताना अनिल पवार म्हणाले की, आज आपण रोहिदास पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुकबधिर शाळेवर एक छोटासा सामाजिक उपक्रमाचा कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम  दुर्गा शिंदे यांच्या संकल्पनेतून झाला असून या कार्यक्रमाचे श्रेय त्यांना जात आहे. या कार्यक्रमातून दिसून येते की, मूकबधिर शाळेवर असणारी गोरगरीब मुले यांच्यासाठी वाढदिवसाचा इतर खर्च टाळून मूकबधिर मुलांना वाढदिवस निमित्त  खाऊ आणि फळे वाटप करून साजरा केला. हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. यापुढे  सामाजिक उपक्रम करून लहान मुलांबरोबर आनंद उत्सव साजरा करत वाढदिवस  करावा. या वाढदिवसानिमित्त त्यांना आमचे मेंबर मित्र परिवार यांच्यावतीने शुभेच्छा.
तसेच मूकबधिर शाळेचे तुकाराम सर म्हणाले की ,अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपण या ठिकाणी राबवला आहे आपण भविष्यकाळात देखील असेच वेगवेगळ्या माध्यमातून या मूक बधिर मुलांसाठी फूल नाही फुलाची पाकळी म्हणून मदत करत राहावी आपल्या सर्व ग्रुपला वाढदिवसानिमित्त संदेश द्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले.
close