श्रीरामकथा ..
वाचता श्रीरामकथा
दुरावे सा-या व्यथा
प्रभु तो रक्षणकर्ता
काळजी नको वृथा
निरामय सुचरित्र ते
सत्छील पत्नीव्रता
एकनिष्ठ वचनबध्द
अलौकीक प्रेमकथा
मोह ना राज्यसत्ता
विरळा ही महानता
वनवास मान्य तया
दिल्या शब्दाकरिता
सुवर्ण लंका जिंकता
बिभीषणाअदा सत्ता
राम राज्य दुजे नोहे
नाहीअसा राज्यकर्ता
2
मंदीर ..
रामराया हे शरीर
आहे तुझेचं मंदीर
रोमरोम राम राम
नाम घ्याया अधीर
मन जणूं गर्भ गृह
शरयु वाटे रूधीर
अभिषेक नयनात
दाटून आले नीर
जीभ घेई रामनाम
सदाचाले जयकार
अवयव कर्मयोगी
कर्म करे सदाचार
मनी सुंदर विचार
जावो दूर ते विकार
विनंती श्रीरामाला
द्या जीवना आकार
3
श्री राम ..
वनवासा जाई राम
त्यागून राज्य सुखा
लक्ष्मण निघतो संगे
भोगतो अनंत दु:खा
भरत राहतो व्रतस्थ
स्थापून राम पादुका
हनुमंता मोह नाही
राम भक्तीचा भुका
समजला नाही राम
कसा तुजला मुर्खा
मोहात अडकलेला
राही सदैव सारखा
मंदीर बांधी रामाचे
रामनाम नाही मुखा
जाणली न रामकथा
कवटाळू बसे दुःखा
४)
राम नाम..
राम झाला वनवासी
वैभव त्यागे मोहमुक्त
माता शब्द शिरोधार्ह
वाटून सुख होई रिक्त
प्रभू पादुका गादीवर
भरत राहतो व्रतस्थ
न भोगी राज वैभव
राजा असूनि त्रयस्थ
सुवर्णलंका जिंकूनही
बिभीषणा दिले तक्त
अयोध्या हो स्वर्गमयी
रामराज्य देई सशक्त
सत्ता मोहात गुंतलेले
आम्ही म्हणे रामभक्त
नासलेले सगळे रक्त
राम नाम हवेयं फक्त
५)
सिताराम ..
वनवासा जाई राम
त्यागून राज्य सुखा
लक्ष्मण निघतो संगे
भोगतो अनंत दु:खा
भरत राहतो व्रतस्थ
स्थापून राम पादुका
हनुमंता मोह नाही
राम भक्तीचा भुका
सुखी सारे प्रजाजन
नगरी न कुणी भुका
सर्वे संतु निरामया:
सुराज्या फळे चाखा
राजा प्रजाभिमुखा
प्रजेला विसरू नका
राम राज्य श्रेष्ठ तम
कथेतून हेचि शिका
- हेमंत मुसरीफ पुणे .
9730306996.
www.kavyakusum.com

