शिर्डी । प्रतिनिधी :-
शिर्डी येथील बायजामा प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही चिडर्डीला श्रीरामनवमी उत्सवा निमित्त येणाऱ्या साई पालखीतील पदयात्रीसाठी वायीजवळ गलकोण फाटा येथे दिनांक सात ते नऊ एप्रिल दरम्यान 24 तास साई भवान्याचे आयोजन करण्यात आले असून या साई भद्वारा त साईपदयात्री साईभक्तानी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन शिर्डी पेथील बायजा मा. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सराव कोते यांनी केले आहे.
शिर्डी येथील बायजा मा प्रतिष्ठानच्या वतीने दर रामनवमीला साई पदयात्री साठी साई भंडाराचे आयोजन करण्यात येत असते गेल्या दोन वर्षापासून कोरोणामुळे या साई भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र या वर्षी कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे व साई पालख्यांना परवानगी मिळाल्यानंतर शिर्डीत रामनवमी निमित्त येणाऱ्या सर्व साई पालखीतील पदयात्री साठी सिन्नर-शिर्डी या रस्त्यावर वाची जवळ मलकोण फाट्यावर बायजा मा. प्रतिष्ठान च्या वतीने भव्य साई महान्याचे आयोजन सात ते नऊ या एप्रिल या कालावधीत करण्यात आले आहे.
यासाठी येथे भव्य मंडप टाकण्यात आला असून येथे नाई पदयात्री साठी विश्रांती व झोपण्यासाठी गाद्या तबके याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे साई पदयात्रींना थंडगार पाणी, स्नानासाठी गरम पाणी तसेच चहा नाश्ता दुपारी थंडगारमा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे शिर्डीकडे येणाऱ्या साई पदयात्री साठी, स्वागता साठी डी जे लावला जाणार आहे. साईभकासाठी 24 तास या महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. महा प्रसादामध्ये चपाती, डाळ, भात, भाकरी, पिठल, शिरा, बर्फी असे पदार्थही राहणार आहेत तेवीस वर्षांपासून बायजा मा प्रतिष्ठान रामनवमीच्या काळात साई पदयात्री यासाठी यामलढोण फाट्यावर साई भान्याचे आयोजन करत असते.
या साई भंडारा साठी पंधरापुरुष व दहास्त्रिया तीन दिवस अहोरात्र मेहनत घेऊन स्वयंपाक बनवणार आहेत. यासाठी बायजा मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सर्जेराव कोते सरचिटणीस जितेश लोकचंदानी संजय जगताप किशोर वाणी, पोपटराव डांगे, बापू गायके, साईराज सर्जेराव कोते. राजेंद्र कोते, वैभव कोते आदीसह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यासाठी परिश्रम घेत आहेत. तरी या साई भंडाराचा साईभक्त, साई पदयात्री व नागरिकांनीही लाभ घ्यावा असे आवाहन शिर्डीतील बायजामा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

