shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वामी मुक्तानंद विद्यालय, येवला कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी प्रा. सुनिल देवरे तर उपाध्यक्ष पदी सुभाष पगारे यांची बिनविरोध निवड...!


         आज सोमवार दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी स्वामी मुक्तानंद विद्यालय कर्मचारी पतसंस्था मर्यादित येवलेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. सदर निवडणूक ही विद्यालयात निर्णय अधिकारी श्री. जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.यावेळी पतसंस्थेचे सर्व संचालकांनी अध्यक्ष पदी प्रा.श्री सुनिल देवरे यांना तर उपाध्यक्ष पदी श्री. सुभाष पगारे यांची बिनविरोध निवड करण्यात केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती मातेला दीप प्रज्वलन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी पतसंस्थेचे संचालक संतोष राऊळ, रामभाऊ वडाळकर, भाऊसाहेब गायकवाड,सुनिल जगदाळे, रामदास खैरनार, गोरख गायकवाड, आण्णा पवार तसेच महिला संचालक सौ.खैरनार, सौ. महाले व पतसंस्थेचे सचिव श्री. कोकणे सर, माजी अध्यक्ष विलास चित्ते उपस्थित होते. 

   सदर नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष  यांचे गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्री. अमृतसा पहिलवान व सेक्रेटरी दिपकभाऊ गायकवाड़ व इतर संचालक मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. त्याचप्रमाणे विद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य व सर्व शिक्षक बंधु यांनी अभिनंदन केले. यावेळी नवनियुक्त अध्यक्ष देवरे यांनी पतसंस्थेचा  विकास, पारदर्शक कामकाज व विश्वासार्हतेने कार्य करण्याचे आश्वासन  दिले. आभार प्रदर्शन सचिव कोकणे यांनी केले.
close