प्रतिनिधी :संजय वायकर
चिचोंडी पाटील : ९ / नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे आठवड सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन श्री . शरद बाबासाहेब गुंजाळ, व्हा.चेअरमन नानासाहेब मोरे आदींसह नवनिर्वाचित संचालक मंडळाचा नागरी सत्कार चिचोंडी पाटील ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे,शिक्षकनेते आबासाहेब कोकाटे,कामधेनु पतसंस्था चेअरमन डॉ.ययाती फिसके,मा.सरपंच पांडुरंग कोकाटे,मा.चेअरमन महादेव खडके, शिवसेना नेते डॉ.मारुती ससे यांचे हस्ते करण्यात आला.
सेवा सहकारी सोसायटी ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण संस्था आहे.सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या जातात.जिल्हा बँकेचे कर्ज या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप होत असल्यामुळे सोसायट्यांना वेगळे महत्त्व असल्याचे प्रतिपादन सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांनी केले.
आठवड सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी महाविकास आघाडीचे शरद बाबासाहेब गुंजाळ तर व्हा.चेअरमनपदी नानासाहेब मोरे यांची निवड झाली. संचालकपदी तुकाराम दाताळ,जिवाजी लगड,भागीरथ लगड,अर्जुन दळवी,अशोक नालकुल,बाबासाहेब मोरे,शिवाजी मोरे,किशोर दाताळ,रामकिसन जाधव,विद्याधर मोरे आदींची मोठ्या मताधिक्याने निवड झाली.या पदाधिकार्यांसह आठवड येथील अशोक चोभे,राजेश जाधव,शरद मोरे,जालिंदर लगड बाबासाहेब मोरे बाळासाहेब गुंजाळ या सर्व मान्यवरांचा सत्कार चिचोंडी पाटील येथे करण्यात आला.
यावेळी मा.सरपंच मच्छिंद्र खडके,मा.सरपंच अमोल कोकाटे,चेअरमन राजेंद्र कोकाटे, उपसरपंच भाऊसाहेब ठोंबरे, मा.उपसरपंच शरद पवार,मा.चेअरमन विठ्ठल कोकाटे,अण्णासाहेब कोकाटे, ग्रा.पं.सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे,महादजी कोकाटे,संदीप काळे,प्रशांत कांबळे, शिवसेना नेते प्रभाकर हजारे,अजय कांकरिया,भाऊसाहेब वाडेकर,पवार सर,कल्याण पाटील,दत्तात्रय भोस,संदीप सुरवसे,पांडुरंग वाडेकर,संतोष वाडेकर,गणेश वाडेकर,दत्ता जाधव,जयसिंग दळवी,बंडूदादा कोकाटे,राणू मुटकुळे,अनिल चव्हाण,सुनिल कोकाटे,छबूराव कोकाटे,शंकर कोकाटे,मोहन कोकाटे आदींसह ज्येष्ठ नागरिक विचारमंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन ठोंबरे यांनी केले तसेच आभार मा.सरपंच अमोल कोकाटे यांनी मानले.

