श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त सुरू झालेला व श्री सप्तशृंगी माता मंदिर वर्धापन दिनानिमित्त भव्य साईचरित्र पारायण व श्री रामचरित्र चिंतन व कीर्तनाचे होणारं आहे लाभ...!
शिर्डी । प्रतिनिधी( संजय महाजन ):- श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त सुरू झालेला व श्री सप्तशृंगी माता मंदिर वर्धापन दिनानिमित्त भव्य साईचरित्र पारायण व श्रीराम चरित्र चिंतन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक 9/4/2022 ते 16/4/2022 या कालावधीत करण्याचे आयोजन करण्यात आले आहे गुढपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे.
तरी शिर्डी साकुरी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे श्रीराम चरित्र चिंतन प्रवचन 9 एप्रिल 2022 ते दिनांक 13 एप्रिल 2022 दररोज सायं सात वाजता संत जनार्दन स्वामी महाराज यांचे कृपा पात्र शिष्य श्री भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांच्या मधुर वाणीतुन दिव्य दर्शन दिनांक 14 एप्रिल 2022 सायं सात वाजता युवा कीर्तनकार ह भ प राहुल महाराज डुंबरे वासल्य वारकरी शिक्षण संस्था मेंढी
15 एप्रिल 2022 सायं सात वाजता समाज प्रबोधनकार ह भ प दत्ता महाराज वैद्य निफाडकर सोळा एप्रिल 2022 सकाळी दहा वाजता प पु महंत स्वामी काशीकानंदजी महाराज परमहंस आश्रम श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था शिर्डी निमगाव यांचे काल्याचे कीर्तन होईल.
पारायण व्यासपीठ साई भक्त महेश बाविस्कर ह भ प लहू महाराज कराळे हरिपाठ नेतृत्व ह भ प आदिनाथ महाराज भालेराव साईबाबा वारकरी शिक्षण संस्था व परिसरातील भजनी मंडळ परिसरातील सर्व भाविकांनी प्रत्येक कार्यक्रमात तन-मन-धनाने सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी स्वतः आपला आनंद द्विगुणीत करावा सोहळ्यासाठी देणगी देणाऱ्या भाविकांनी देणगी देऊन पावती घ्यावी ही विनंती.
दैनदिन कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी चार ते अकरा साई चरित्र पारायण सकाळी पाच ते सहा हरिपाठ सायंकाळी सात ते साडे नऊ प्रवचन कीर्तन रात्री सत्संगानंतर महाप्रसाद होईल आयोजन शिर्डी साकुरी परिसरातील सर्व ग्रामस्थ श्री साई बाबाच्या पावन भूमीत गेल्या दोन वर्षापासून पारायण न झाल्यामुळे प्रत्येक घरातून कमीत कमी एक व्यक्तीने पारायणास बसावे ही विनंती कार्यक्रमाचे ठिकाण सप्तशृंगी माता मंदिर शिर्डी साकुरी शिव तालुका राहाता जिल्हा अहमदनगर असे आयोजकांच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.

