राहुरीतील प्रगती विद्यालयाच्या सन १९९०-९२ मधील दहावी पास झालेल्या माजी विद्याथींयांनी संयुक्त स्नेहमेळावाचे आयोजन...!
- अध्यक्षस्थानी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. ४-४-२०२२
राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना ज्या शिक्षकांनी शिकवले त्या शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा गौरव केला. आपल्याच शाळेत शिकलेला विद्यार्थी राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम पहात असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया निवृत्त झालेल्या शिक्षकांनी व्यक्त केली.
राहुरीतील प्रगती विद्यालयाच्या सन 1990-92 मधील दहावी पास झालेल्या माजी विद्यार्थीयांनी संयुक्त स्नेहमेळावा आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे होते. या वेळी मोठ्या संख्येने गुरुवर्य उपस्थित होते. कार्यक्रमात प्रथम जे शिक्षक दिवंगत झाली त्यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा सन्मान करून सोहळा साजरा केला. सर्व शिक्षकांना फेटा शाल सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन माजी विद्यार्थी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली व जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी शिक्षकांनी वेळोवेळी केलेल्या सूचनामुळेच आम्ही आज वेगळ्या क्षेत्रात कामगिरी केल्याची भावना सर्वांनी व्यक्त केल्या
यावेळी शिक्षकांनी तब्बल जवळपास 32 वर्षानंतरही आठवणीने आम्हास बोलावून सन्मानित केले. याबद्दल या सर्व विद्यार्थ्यांबद्दल आम्हाला अभिमान असल्याच्या भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या. आपली मनोगते व्यक्त करताना अनेक आठवणी कथन केल्या .
आठवण सांगत असताना शिक्षक म्हणाले की, माजी विद्यार्थी प्राजक्त तनपुरे आज राज्यात मंत्री असून याचा आम्हास सार्थ अभिमान आहे, तसेच बरेच विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असल्याचा अभिमान असल्याच्या भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या.त्यामुळे बत्तीस वर्षानंतरही विद्यार्थ्यांना मागील वर्गात असल्याचे जाणवत होते. यावेळी शिक्षक श्री एन एन उगले,जी डी कराळे ,एस एस कोहकडे, ए जी तनपुरे ,एस एस गुलदगड ,एस डी शेडगे ,एन ई पवार ,एस एल वाखारे, एस बी गुणे, श्रीमती बी व्ही वीरकर , एस डी भालसिंग ,एस यु आमले ,एस आर कदम आदींनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी सर्व विद्यार्थी मंत्रमुग्ध होऊन शिक्षकांच्या भावनांना टाळ्यांनी साथ देत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शिक्षकांनी आपणास त्यावेळी कसे घडविले याबद्दल अनेक किस्से सांगितले.त्यावर विद्यार्थी मित्र व शिक्षकांनी भरभरून दाद दिली. या वेळी वातावरण पूर्णपणे भारावून गेले होते.
कार्यक्रमात शेवटी सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन घेतले.
हा कार्यक्रम घेण्यासाठी मंत्री तनपुरे यांचे मार्गदर्शनाखाली सूर्यकांत भुजाडी ,गोवर्धन तनपुरे दत्तात्रय कदम, सलीम बागवान, संजय बनसोडे ,संजय शिरसाट, महादेव साखरे ,अनिल कोकाटे ,जलील पठाण आदींनी विशेष परिश्रम घेतले.

