अंगावर आलात तर शिंगावर घेऊ.....
इंदापूर भाजपला राष्ट्रवादीचे अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर यांचा इशारा
*काचेच्या बंगल्यात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडे मारू नयेत*
इंदापूर प्रतिनिधी: अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असे इंदापूर भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचे इंदापूर तालुका युवक अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर यांचा इशारा दिला.
इंदापूर तालुक्याचे आमदार व राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावरती विरोधकांकडून मागील काही दिवसांपूर्वी वैयक्तिक पातळीवर जाहीर टीका केली गेली होती. इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी कडून अनेक वेळा राज्यमंत्री यांच्यावरती खालच्या पातळीवर टीका करून निष्क्रिय लोकप्रतिनिधी अशी टीका केली जात असते. यावरून काल डाळज न 2 येथे झालेल्या जाहीर सभेत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांना लबाड व लफांगे म्हणत जहरी टीका केली होती. यावरून आज भाजपा कडून मंत्री यांना ही शोभणारी भाषा नाही असे म्हणत टीका केली गेली.
यावर सुरुवात तुम्ही केली होती त्यामुळे आम्ही टीका केली म्हणून तुम्हाला एवढं झोंबण्याची काय कारण ? आम्ही विरोधकांना हा शब्द वापरून कोणाचेही नाव न घेता टीका केली होती,मग तुम्ही लबाड नसाल तर तुम्हाला राग येण्याचे कारण काय असा सवाल इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड.शुभम निंबाळकर यांनी विचारला आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वरती विनाकरण सातत्याने निष्क्रिय लोकप्रतिनिधी अशी टीका केली जाते पण खऱ्या अर्थानं वीस वर्ष कोण निष्क्रिय होतं आणि गेल्या दहा वर्षात कोण सक्रिय आहे हे इंदापूरच्या जनतेला आता चांगलेच माहित झाले आहे. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे इंदापूरच्या जनतेचा स्वाभिमान आहेत त्यांच्यावर जर यापुढे खालच्या पातळीची टीका केली तर जशास तसे उत्तर देऊन अंगावर आलात तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. काचेच्या बंगल्यात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगडे मारू नयेत, ते परवडणार नाही. असा इशारा इंदापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. शुभम निंबाळकर यांनी दिला आहे. आता विरोधकाना काहीच काम उरले नाही. इंदापूरच्या स्वाभिमानी जनतेने त्यांना दोन वेळा घरी बसवले आहे. त्यांनी आता आराम करावा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सुरू असलेला विकासाचा झंझावात घरी बसून त्यांनी पहावा. यापेक्षा अधिक त्यांनी काही करण्याची त्यांच्याकडून इंदापूरच्या जनतेला अपेक्षा नाही. असेही शुभम निंबाळकर यांनी म्हटले आहे.

