कर्जत । विजय डेरवणकर :-
करसनदास मुळजी ग्रंथालय माथेरान २०२२मे, ला १२५ वर्ष पूर्ण करत आहेत, त्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी आज करसनदास मुळजी वाचनालयात बैठक आयोजित केली होती, या वेळी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमा विषयी सविस्तर चर्चा विनिमय करण्यात आले, २०२२ मे ,ला करसंनदास मुळजी ग्रंथालय ला १२५वर्षे पूर्ण होत आहेत त्या वेळी व पुढील वर्षभरात माथेरान नगरपालिका, रायगड जिल्हा ग्रंथालय संघ, कोकण विभाग राज्य ग्रंथालय संघ, यांच्या माध्यमातून अनेक विविध कार्यक्रम होणार आहेत, ग्रंथ दिंडी, ग्रंथपाल साठी कार्यशाळा, रायगड जिल्हा ग्रंथालयाला ७५वर्ष पूर्ण झाली आहे. त्या साठी एक स्मरणिका प्रकाशीत करण्यात येणार आहे.
शालेय विद्यार्थी ना वाचनालयाची ओढ निर्माण व्हावी यासाठी विद्यार्थ्यांनसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे, बालवान्मय ची सोय असणे आवश्यक आहे तसेच सिनियर सिटीजन साठी काही करता येईल का यासाठी प्रयत्न करणार आहेत,माथेरानच्या करसंनदास मुळजी वाचनालयाला १२५वर्ष जुना इतिहास आहे, मागील कोरोना काळ आणि सद्या इंटरनेट, मोबाईल सारख्या सोशल मीडियाशी तोड देत आजही सुस्थितीत , दिमाखात दौलात उभी आहे याचा गर्व माथेरान कराना आहे , माथेरान ला आल्यावर एक मन शान्त आणि आपल्या वाचनछंद जोपासणारे अनेक पर्यटक येथे आवर्जून भेट देत असतात कोरोना, काळात वाचनालयाकडे थोडा दुरावा निर्माण झाला होता जुने सभासद असून ही काहींची हिरमोड होत होती परंतु आता नव्या जोमाने उमेदीने १२५ वर्ष साजरा करतात नवनवीन विचार आचार अमलात आणून १२५० नवीन सभासद पूर्ण करण्याचा मानस मुख्याधिकारी सुरेखा भणगे मॅडम यांनी व्यक्त केला त्यातून वाचनालय फंड व पुस्तकांची शाळा ही संकल्पना राबवता येईल, आजच्या सभेस सकारात्मक चर्चा झाली त्यात पुन्हा एकदा करंसनदास मुळजी वाचनालय आपले गतवैभव प्राप्त करून वाचू लागेल गोष्टी सांगू लागले हे नक्की आजच्या बैठकीस मुख्याधिकारी सुरेखा भणगे -शिंदे मॅडम, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष संजय बोदांडे, प्रवाहक संजय भायदे,राजेश खेडेकर, रामदास गायकवाड, रत्नदीप प्रधान, प्रवीण सुर्वे,,अंकुश हिचके, न्यानेश्वर , अन्सार महापुळे, कर्मचारी नागरिक उपस्थित होते.
-----------------------------------------–
माथेरान मध्ये अनेक मुख्याधिकारी आले परन्तु वाचनालय विषयी कोणीही जास्त लक्ष दिले नाही परंतु वाचनालय म्हणचे हल्ली दुर्लक्षित होत चाललेले ठिकाण परन्तु कामाची ओढ जबाबदारी आवड ची मानसिकता लागते हेच आजच्या मिटींग नियोजन व त्याची तयारी करत असताना पहिल्याच मुख्याधिकारी मॅडम सुरेखा भणगे यांनी स्वता पुढाकार घेतला आहे व आम्हालाही त्याच्या सोबत काम करण्यास आनंद होत आहे
रत्नदीप प्रधान-वरिष्ठ लिपिक मा , न,
----------------------------------------------
माथेरान नगरपरिषद वाचनालयाची जी संख्या आहे, ती कशी वाढ होईल याकडे लक्ष देऊन येणाऱ्या पर्यटकांना वाचनाबाबत कशी सेवा देता येईल याकडे लक्ष केंद्रित करणार आहे शिवाय शालेय जीवनापासून वाचकांना वाचनाची कशी आवड निर्माण होईल या साठी प्रयोजन करण्यात येईल, नवनवीन संकल्पना पुढे आणून राबविण्यात येणार आहेत
सुरेखा भणगे-शिंदे-मुख्याधिकारी , प्रशासन,माथेरान
---------------------------------------------
१२५वर्ष पूर्ण करणारी रायगड जिल्ह्यातील च नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टीने एक महत्वाचे हे वाचनालय असून १२५वर्षे जुनी ग्रंथ संपदा या मध्ये सामावली आहे,असा अलौकिक ठेवा इतर कोणत्याही वाचनालयात बघायला मिळनार नाही
संजय बोदांडे-अध्यक्ष जिल्हा ग्रंथालय.

