shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंथूर्णे येथील क्रीडा संकुलामध्ये बास्केटबॉल कोर्ट,टेनिस कोर्ट,स्टेज व पव्हेलियन बांधकामासाठी १ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

अंथूर्णे येथील क्रीडा संकुलामध्ये बास्केटबॉल कोर्ट,टेनिस कोर्ट,स्टेज व पव्हेलियन बांधकामासाठी १ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
  
इंदापूर प्रतिनिधी:अंथूर्णे येथील क्रीडा संकुलामध्ये बास्केटबॉल कोर्ट,टेनिस कोर्ट,स्टेज व पव्हेलियन बांधकामासाठी १ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहे.
 येथील क्रीडा संकुलामध्ये यापूर्वी १ कोटी ८१ लाख रुपये खर्चून कबड्डी मैदान, धावण मार्ग,व्हॉलीबॉल मैदान, खोखो मैदान,क्रिकेट पीच व बहुउद्देशीय हॉल उभारण्यात आला आहे.आता नव्याने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वरील निधी मंजूर झाला असून शनिवार दि.२ रोजी मंत्री भरणे यांच्या हस्ते या कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला.
        यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रताप पाटील,भाजपचे युवराज म्हस्के,सरपंच लालासो खरात, माजी सरपंच राहुल साबळे,तानाजी शिंदे,दत्तात्रय गायकवाड,विशाल साबळे,बाळू वाघ,राघू गायकवाड, अजय भुजबळ,पिंटू साबळे,राजेश ढावरे आदी उपस्थित होते. चौकट : यावेळी बोलताना मंत्री भरणे म्हणाले,इंदापूर येथील क्रीडा संकुलात जलतरण पुल निर्माण करण्यासाठी २ कोटींच्या निधीस नुकतीच मंजुरी घेतली असून लवकरच काम सुरू होणार आहे. फोटो.... अंथूर्णे येथील क्रीडा संकुलामध्ये भूमिपूजन करताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
close