shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक विकास पॕनलचे सर्व उमेदवार सभासदांच्या पाठिंब्याने विजयी होणार - ज्ञानदेव बागल

शिक्षक विकास पॕनलचे सर्व उमेदवार सभासदांच्या पाठिंब्याने विजयी होणार - ज्ञानदेव बागल
   इंदापूर प्रतिनिधी:दि १४ इंदापूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक २४ एप्रिल रोजी होत असून त्यानिमित्ताने शिक्षक विकास पॕनलचा प्रचार शुभारंभ व्याहाळी येथील श्री भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून  करण्यात आला. सत्ताधारी शिक्षक समितीच्या संचालक मंडळाने  गेली १६ वर्षात पारदर्शी , सातत्याने सभासदांना दिलेली विनम्र व तत्परसेवा  , सभासदहित डोळ्यासमोर ठेवून केलेल्या कारभारामुळे शिक्षक विकास पॕनलच्या सर्व २१ उमेदवार बहुमतांनी विजयी  होतील असा विश्वास पॕनल प्रमुख ज्ञानदेव बागल यांनी  यावेळी बोलताना व्यक्त केला. यावेळी संतोष लोखंडे , सहदेव काळेल , किरण म्हेत्रे यांनी निवडणूकी संदर्भातील सविस्तर भुमिका मांडली.सुनिल वाघ यांनी  निवडणूक प्रचार नियोजन सांगितले , प्रभाकर लावंड यांनी स्वागत केले , आभार संतोष हेगडे यांनी मानले.
यावेळी शिक्षक विकास पॕनलचे प्रमुख ज्ञानदेव बागल , चेअरमन वसंत फलफले , हरिश काळेल , सुनिल वाघ , संतोष लोखंडे , सहदेव काळेल , नजीर शिकीलकर , भारत ननवरे , किरण म्हेत्रे , नितिन वाघमोडे , विष्णू पराडे , सुभाष भिटे , लतिब तांबोळी , सतिश खटके , बापूराव जाधव , तुकाराम ठोंबरे , संभाजी काळे , शांताराम रणवरे , लालासाहेब वणवे , हनुमंत दराडे , संतोष हेगडे , सुनिल शिंदे , सुनंदा बोके , शोभा भोसले , जयश्री ओव्हाळ / धाईंजे यांचेसह शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी , सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close