पूर्णा । प्रतिनिधी- औरंगबाद जवळील दौलताबाद जवळ एका रेल्वे मालगाडीचे २ डब्बे अचानक दि २ एप्रिल रोजी सकाळी रुळावरुन घसरुन पडले. रुळावरुन घसरलेले डब्बे उचलण्याचे काम युध्दगतीने चालू आहे. त्यामुळे मुंबई - हैद्राबाद कडे जाणाऱ्या येणाऱ्या रेल्वे प्रवासी गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. या मध्ये सचखंड, तपोवन या रेल्वे प्रवासी गाड्यांचा समावेश आहे. मालवाहतूक रेल्वे गाडी रुळावरुन कसी घसरली? या चा तपास रेल्वे यंत्रणेकडून चालू आहे.असी माहिती दमरे कडून मिळाली आहे.
प्रवाशांची हेळसांड
मालवाहतूक रेल्वे गाडी रुळावरुन पडल्यामुळे डब्बे उचलोस्तर सर्व रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या. त्यामुळे रेल्वे प्रवाशांची हेळसांड झाली आहे. तपोवन, सचखंड व ईतर रेल्वेने आज गुढीपाडवा असल्याने प्रवासी गावी जात होते. त्यांना पाडवा पुजन वेळेवर करता आले नसल्यामुळे त्यांची ससेहोलपट झाली. दरम्यान, रुळावरुन घसरलेले डब्बे काढण्यासाठी क्रेन येईपर्यंत प्रवासी गाड्या थांबवण्यात आल्या होत्या.

