हर्षवर्धन पाटील यांचेकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
- पाटील कुटुंबीयांकडून गुढीपाडवा उत्साहात
इंदापूर: प्रतिनिधी
इंदापूर येथे नव वर्ष पाडवा सणानिमित्त भाग्यश्री निवासस्थानी गुढी उभारून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाग्यश्री पाटील व राजवर्धन पाटील यांनी शनिवारी ( दि.२) गुढीची विधिवत पूजा केली. सर्वांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, प्रत्येकाच्या जीवनात हर्ष आणि नवचैतन्य, धन व आरोग्य संपदा नांदावी अशी प्रार्थना यावेळी पाटील कुटुंबियांनी केली. यानिमित्ताने हर्षवर्धन पाटील यांनी नागरिकांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
आपला महाराष्ट्र हा विविधतेंनी नटलेला आणि विविध जन समूह, विविध संस्कृती, अनेक
धर्म, पंथ, भाषा, बोली यांनी समृद्ध असा देश आहे, गुढी पाढवा म्हणजे नवचैतन्याची सुरुवात असते. या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच भाग्यश्री पाटील, राजवर्धन पाटील यांनी सर्वांना गुढीपाडवा सणानिमित्ताने शुभेच्छा व्यक्त केल्या.

