कौठळी शाळेत नवागतांचे स्वागत व शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात पार.
शाळापूर्व तयारी मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागण्यास मदत होऊन गुणवत्ता व पट वाढणार - संभाजी आजबे(केंद्रप्रमुख)
इंदापूर प्रतिनिधी:दिनांक १६ एप्रिल२०२२ रोजी जि प प्राथमिक शाळा कौठळी येथे शाळापूर्व तयारी मेळावा उत्साहात पार पडला.प्रथम दाखलपात्र विद्यार्थी,शाळेतील विद्यार्थी, माता,पालक,ग्रामस्थ यांची मिळून प्रभातफेरी काढण्यात आली.नंतर मुलांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.नंतर केंद्रप्रमुख संभाजी आजबे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.संभाजी आजबे यांनी प्रास्ताविक केले.
दाखलपात्र १५ मुलांना दाखल करून घेतले.नंतर त्या सर्व मुलांची आयडिया कार्ड भरून घेण्यात आली.त्यामध्ये विद्यार्थी नाव,कौटुंबिक माहिती,वजन,उंची,शारीरिक विकास,भावनिक विकास,गणनपूर्व तयारी तपासण्यात आली.शेवटी सर्व पालकांना सूचना देऊन समुपदेशन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड यांनी केले तर आभार मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी, अंगणवाडी सेविका राजश्री मोरे,मदतनीस पोळके मॅडम,उपशिक्षक भारत ननवरे,आरती गायकवाड व शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.या मेळाव्यास शाळा व्य समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य,माता ,पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

