shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिखली येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्सहात संपन्न.

चिखली येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्सहात संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: अध्यात्मिक विचारांची जोड आणि हरिनामाचा गजर चिखली गावामध्ये रामनवमी च्या मुहुर्तावर सालाबाद प्रमाणे होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा सुरुवात झाली आणि हनुमान जयंती उत्सवानंतर याची सांगता झाली.या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये लहानापासून मोठ्यापर्यंत गावातील सर्वजण यामध्ये हरिनामाचा गजर , श्रवण करून भक्तीमय वातावरणात आनंद उत्सव साजरा करत असतात. या वर्षी रामनवमी दिवसी सप्ताहाची सुरुवात झाली आणि ह.भ.प. राहुल महाराज चोरमले यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.
या सप्ताहामध्ये ज्ञानदेव खिलारे यांची कल्याचा महाप्रसादाची पंगत झाली. 
अखंड हरिनाम सप्ताहाची व्यासपीठ चालक पांडुरंग दराडे होते तर सुरेश मोरे तसेच किर्तनसाथ गायक दत्तात्रय महाराज घुले , हनुमंत अर्जुन, सुभाष मदने , भारत रिठे, रामदास निकम, दादा बोडरे महादेव मोरे, राजेंद्र अर्जुन, भारत सुळ, मृदंगवादक विशाल महाराज दराडे यांनी आप आपल्या परीने सेवा केली.
 समस्त भजनी मंडळ चिखली यांच्या वतीने  चालु आसलेल्या नामयज्ञाची सांगता ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्सहात पार पडली असल्याची माहिती राजेंद्र अर्जुन यांनी दिली.
close