shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वांबोरी गावासह वाड्या-वस्त्यांवर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जल जीवन मिशन योजने अंतर्गत 40 कोटी 64 लाख रुपये करण्यास परवानगी ; लवकरच कार्यारंभ होणारं- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 गुरुवार दिनांक १९ मे २०२२

वांबोरी गावासह वाड्या-वस्त्यांवर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जल जीवन मिशन योजने अंतर्गत 40 कोटी 64 लाख रुपये खर्च करण्यास परवानगी ; लवकरच कार्यारंभ होणारं- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे..!!

राहुरी : तालुक्यातील वांबोरी गावासह वाड्या-वस्त्यांवर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जल जीवन मिशन योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता त्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली असून सुमारे 40 कोटी 64 लाख रुपये खर्च करण्यास परवानगी मिळाली आहे लवकरच कार्यारंभ आदेश होऊन कामास सुरुवात होणार असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
      अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की वांबोरी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वाड्यावस्त्यां विखुरलेल्या अवस्थेत आहेत या सर्वच भागातील जनतेला शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावाचा समावेश करण्यात आला.

    त्या दृष्टीने सर्वेक्षण होऊन विविध बैठका घेत दुरुस्त्या करत प्रस्ताव सादर झाला होता, अखेर प्रशासकीय मान्यता मिळाल्याने योजना मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला.

     राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील बहुतांश गावांना जल जीवन मिशन योजनेचा लाभ मिळावा म्हणून अभ्यास पूर्ण योजना व्हावी म्हणून नगर नाशिक मंत्रालय स्तरावर प्रयत्न करण्यात आले या सर्वच योजनांना निधी मिळणार असून काही योजनांना कार्यारंभ आदेश मिळाले आहेत वाड्यावस्त्यांवर विखुरलेल्या नागरिकांनाही योजनेचा लाभ व्हावा म्हणून काही ठिकाणी बदल करण्यात आले काही गावांचा समावेश करण्यात आला आहे प्रशासकीय मान्यता मिळाल्याने वांबोरी शहर व परिसरातील नागरिकांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close