shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेवासा अपहरण प्रकरणातील आरोपी मुलीसह गोव्यातून ताब्यात ; !! मोबाईल लोकेशनवरून लागला शोध..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 गुरुवार दिनांक १९ मे २०२२

नेवासा अपहरण प्रकरणातील आरोपी मुलीसह गोव्यातून ताब्यात ; !! मोबाईल लोकेशनवरून लागला शोध..!!


नेवासा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केलेल्या नेवासा तालुक्यातील अंतरवाली येथील तरुणास गोव्यातून मुलीसह ताब्यात घेण्यात पोलीस पथकाला यश आले असून त्यांना काल पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
6 मे रोजी अंतरवाली येथील अलीम राजू शेख (वय 22) रा. अंतरवाली ता. नेवासा या तरुणाने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा 7 मे रोजी नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. या अपहरण प्रकरणाच्या तपासात गांभीर्य दाखवले जात नसल्याचा आरोप करून तपास लावा या मागणीसाठी काही लोक 9 मे रोजी नेवासा पोलीस ठाण्यात आले होते. त्यांना पोलीस अधिकार्‍यांनी डांबून ठेवले तसेच अर्वाच्च भाषा वापरल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे करण्यात आली होती. पोलीस अधिक्षकांनीही तक्रारीची दखल घेतली होती. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्याची चर्चा होती.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी तपास सुरू केला होता.

सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावील देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, सुरेश माळी, संदीप दरंदले, रवी सोनटक्के, फुरखान शेख, महिला पोलीस कॉन्स्टेबल सारिका दरेकर, चालक हेडकॉनस्टेबल संभाजी कोतकर अशांनी मिळून नेवासा परिसरात आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना गुप्त बातमीदारांमार्फत आरोपी वापर असलेल्या मोबाईल क्रमांकाची माहिती मिळाली.


नमूद मोबाईल क्रमांकाच्या आधारे मोबाईल सेल विभाग व अपर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपूर येथील मोबाईल सेल यांचे संयुक्त तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी गोव्यात असल्याचे समजले. पथकाने गोवा पोलिसांच्या मदतीने आरोपी व अपहृत अल्पवयीन मुलगी यांना कोलवा बिच (गोवा) येथून ताब्यात घेतले. त्यांना नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

नेवासा पोलीस व एलसीबी पथकाने संयुक्त कारवाई करुन आरोपीला ताब्यात घेतल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी सांगितले. आरोपीवर अपहरणाचा गुन्हा दाखल आहेच. अल्पवयीन मुलीच्या जबाबावरुन आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close