शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक १९ मे २०२२
पाणीप्रश्नी आरडगाव ग्रामपंचायतीवर महिलांचा 'हंडा मोर्चा'..!!
राहुरी : तालुक्यातील आरडगाव येथे गेल्या पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित झाल्याने संतप्त महिलांनी आरडगाव ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला असून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे.
आरडगाव येथे थकित पाणीपट्टी अभावी गेल्या पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा खंडित आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
यावेळी दोन तासात हा पाणीपुरवठा सुरू करू अशी ग्वाही माजी उपसरपंच सुनील मोरे यांनी दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. दोन तासात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा देखील या महिलांनी दिला आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

