आ.किशोर जोरगेवारांनी केला होता या मागणीसाठी सतत पाठपुरावा !
चंद्रपूर-▪️किरण घाटे▪️
बाबुपेठ येथील उड्डाणपुलासाठी उर्वरित 5 कोटी 26 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. मागच्या आठवड्यातही आमदार जोरगेवार यांनी मुंबई येथे नगरविकास मंत्री यांची भेट घेत सदरहु मागणीबाबत चर्चा केली होती. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला व प्रयत्नाला यश प्राप्त झाले असुन बाबुपेठ उड्डाणपुलासाठी 5 कोटी 26 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकिय मान्यता देण्यात आले असल्याचे वृत्त त्यांचे कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे.
▪️बाबुपेठ येथे उड्डाणपुलाची निर्मिती व्हावी अशी येथील नागरिकांची बरीच जुनी मागणी होती. अनेक आंदोलनानंतर सदरहू उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र मागील अडिच वर्षापासुन सदरहु पुलाचा उर्वरित 5 कोटी 26 लाख रुपयांचा निधी प्रलंबीत ठेवण्यात आला होता. त्यामुळे या पुलाच्या बांधकामाची गती स्थिरावली होती. उपरोक्त उर्वरित निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी सन२०१९, २०२० आणि २ एप्रिल २०२१ ला पाठवलेल्या पत्रातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यानंतर सदरहु मागणीचा त्यांच्या वतीने सातत्याने पाठपूरावा सुरु होता. या शिवाय अनेकदा आमदार जोरगेवार यांनी ना. एकनाथ शिंदे यांची भेट घेत सदरहु मागणीबाबत वारंवार त्यांनी त्यांना अवगत केले होते. बाबुपेठच्या उड्डाणपुलाचे बांधकामात निधी अभावी रखडल्याने याचा मोठा त्रास ही येथील नागरिकांना होत होता. त्यामुळे मागच्या आठवड्यात आमदार जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालय येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सदरहु निधीला तात्काळ प्रशासकिय मान्यता प्रधान करण्याची मागणी केली होती. याज्ञवेळी झालेल्या सकारात्मक चर्चेत सदरहु निधीला प्रशासकिय मान्यता देण्याचे निर्देश दिले होते. अखेर आज सदर निधीला नगरविकास विभागाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. आता बाबुपेठ उड्डाण पुलाच्या बांधकामाला गती प्राप्त होणार आहे. सदरहु निधीला प्रशासकिय मान्यता दिल्या बद्दल आमदार जोरगेवार यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे. सोबतच सदरहु पुलासाठी मनपा प्रशासनाने द्यायचा असलेला पाच कोटी रुपयांचा निधीही मनपा प्रशासनाने लवकर द्यावा यासाठीही आपले प्रयत्न सुरु असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

.jpeg)


