shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी नगर परिषदेतील मुख्य लिपिक मुरलीधर देसले सेवानिवृत्त...!


न.पा.व शिर्डी ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आला शुभेच्छा निरोप!

शिर्डी । प्रतिनिधी : (संजय महाजन) :
शिर्डी नगर परिषदेचे मुख्यलिपिक मुरलीधर देसले हे आज आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा शिर्डी नगर परिषद व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्त त्यांचा सत्कार करत त्यांना निरोप देण्यात आला. त्यांच्यावर यावेळी पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

मुरलीधर देसले हे शिर्डी नगर परिषदेमध्ये गेले. गेले काही वर्ष मुख्य लिपिक म्हणून सेवा करत होते. देसले साहेब व शिर्डी नगरपंचायत हे एक गणित तयार झाले होते. अशा मुख्य लिपिक असणाऱ्या मुरलीधर देसले हे सेवेतून निवृत्त होत असल्याबद्दल शिर्डी नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी तसेच शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रांताधिकारी गोविंद शिंदे व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे हे उपस्थित होते. याच प्रमाणे शिर्डीतील सर्व पक्षीय पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक नगराध्यक्ष तसेच शिर्डीतील सर्व संस्था संघटना यांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते शुभेच्छा देत त्यांनी त्यांच्या विविध काम करण्याच्या गुणकौशल्याबद्दल उपस्थितांना यांनी मुरलीधर देसले यांना सेवानिवृत्ती बद्दल वेगवेगळी उदाहरणे देऊन माहिती दिली. अनेकदा त्यामुळे उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले. नेहमी हसतमुख व समोरचा कितीही राग आला तरी त्याला आपल्या बोलण्यातून शांत करणारे देसले साहेब होते. असे त्यांनी यावेळी सांगितले. उपस्थित अनेक मान्यवरांनी मुरलीधर देसले यांच्या विषयी माहिती देत अनेक उदाहरणे ही यावेळी नगर परिषदेमधील कामकाजाबाबत दिले. 

एक कर्तव्यदक्ष सर्व शिर्डी शहरातील विविध कामांची अभ्यासपूर्ण माहिती असलेले मुरलीधर देसले हे व्यक्तिमत्व सर्व शिर्डी करांना परिचित झाले होते. अशा मुरलीधर देसले यांचे कोरोणा काळात मोठे काम होते. त्यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार होताना अनेकांनी त्यांना त्यांच्या या कामकाजाबद्दल अभिनंदन करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी मुरलीधर देसले यांनी आभार मानताना एवढ्या मोठ्या संख्येने मला सेवानिवृत्त झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यासाठी मान्यवर अधिकारी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत हेच मोठे माझे भाग्य आहे. असे सांगत त्यांनी आपल्या आश्रूंना वाट मोकळी करून दिली मोठे भावनिक ते यावेळी झाले होते. या वेळी कमलाकर कोते व निलेश कोते हे या कार्यक्रमात आले व त्यांनी बरोबर मुरलीधर व राधाची मूर्ती त्यांनी सेवानिवृत्ती बद्दल देसले साहेबांना दिली.

 देसले साहेबांचे नाव मुरलीधर असल्यामुळे व मुरलिधरा सारखेच त्यांचे काम असल्यामुळेच त्यांना मुरलीधर व राधा ची मूर्ती यावेळी भेट देण्यात आली. मोठ्या संख्येने या वेळी विविध संस्थांनचे पदाधिकारी ग्रामस्थ नगरपालिकेचे अधिकारी यांनीही मुरलीधर देसले यांना हार पुष्प शाल देऊन सत्कार करत दिसले यांना सेवानिवृत्ती बद्दल व पुढील आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.
close