shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडार समाजातील चमकता तारा मा.राकेशजी विटकर...!

🌷🌷हार्दीक अभिनंदन🌷🌷
     आमचे मार्गदर्शक तथा वडार समाज संघाचे प्रदेक्षाध्यक्ष मा.राकेशजी विटकर यांची पुणे महानगरपालिकेत सुरक्षा अधिकारीपदी पदोन्नती झाल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

           मा. राकेश जी विटकर

श्री राकेश जी विटकर साहेब यांनी आपली नोकरी सांभाळून सामाजिक कार्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तीमत्व आहेत. समाजाचे काही तरी देणे लागतो, यासाठी आपण समाजासाठी योगदान दिले पाहिजे या हेतूने प्रेरित होउन त्यांनी समाजातील अनेक मुलांना पुणे येथे शिक्षण घेता यावे.त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिकेच्या वस्तीगृहाच्यामाध्यमातून प्रवेश देऊन अनेकांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न केला.तसेच नांदेड येथे २००९ लाख मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांचा महामेळावा घेतला तसेच जालना,पुणे येथे चिंतन शिबिर, वधू-वर मेळावे आयोजित केले.वडार समाज जागृती अभियान राबवून हजारो किलोमीटर राज्यभर दौरा केला. हे करीत असताना नोकरी सांभाळत असताना अनंत अडचणीं आल्या त्या सर्व अडचणीवर मात करीत  समाजाची जशी सेवा करता येईल तशी सेवा करत राहिले.हे करीत असताना समाजाकडून कधीच अपेक्षा केली नाही.

पुणे महानगरपालिका सुरक्षा अधिकारी म्हणून पदोन्नती 

      काम प्रशासकीय असो किंवा सामाजिक अभ्यास,कर्तव्य भावना,जिव्हाळा,आपलेपणा, पारदर्शकता यांचा सुरेख मेळ घालणारं एकमेव व्यक्तीमत्त्व ..!
        कोविडच्या भयंकर काळात  स्वतःची तमा न बाळगता रोजगार बाधीत बांधवांना जीवनावश्यक वस्तू पुरविणारा संवेदनशील कोविड योध्दा.सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी तन मन धनाने सदैव तत्पर असलेल व्यक्तीमत्त्व.
आपल्या सहकाऱ्यांना आर्थिक अडचणीत धीर देणारा धुरंधर व्यक्तिमत्त्व..!
      अशीच सेवा यापुढील काळातही देण्यासाठी उच्चपदी विराजमान होवोत हीच मनःपुर्वक सदिच्छा.
      🙏 रामचंद्र मंजूळे 🙏
 पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वडार समाज संघ, महाराष्ट्र राज्य
close