shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कालठण नं. १ येथे लालपरीचे नागरिकांकडून स्वागत


प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

इंदापूर: दि.२/  गेल्या दिड ते दोन वर्षांपासून लाॅकडाऊन मुळे बंद असलेली कालठण नं. 1 ते इंदापूर एसटी बस सेवा आज सुरू करण्यात आली. बऱ्याच दिवसांपासून नागरिकांची विशेषता विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एसटी सुरू करण्याची मागणी केली होती. 

यावेळी चालक मा. श्री. प्रवीण माने व वाहक मा.पंचशील गवळी यांचा नागरिकांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक मा. श्री .साहेबराव पांडुळे व मा.दादासाहेब जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मा. श्री. राम पाटील यांच्या हस्ते एसटीला पुष्प वाहून स्वागत करण्यात आले.   संप संपून नुकतेच  एसटी कर्मचारी सेवेत रुजू झालेले आहेत.  बस सेवा सुरू झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी विष्णू जावळे, श्यामराव लावंड,गोविंद पाडुळे, ज्ञानेश्वर पाटील,बापू जावळे, प्रथमेश गोसावी, नितीन शिरसागर, समाधान चव्हाण,  तुषार घाडगे आणि  प्रवास करणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. एसटी चे अधिकारी मा.मनेर साहेब, मा. वाघमोडे साहेब, मा. खाडे साहेब,मा. शेलार साहेब, मा.नितीन ढेरे, मा.महेश  जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.
close