shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केवळ साजरा करण्यासाठी कामगार दिन नसावा, तर प्रत्यक्षात कामगारांच्या हिताचा निर्णय व्हावा..प्रा सुनंदा साळवे..!

दुर्लक्षित खाजगी कामगारांकडे  कोण लक्ष देणार ? - प्रा.सुनंदा साळवेंची खंत

राहुरी तालुका प्रतिनीधी जावेद शेख दि. १-५

दिनांक २८ एप्रिल सकाळी सहा वाजून तीस मिनिट झाली होती,मी ऑफिससाठी निघाले,बाहेर बघते तर रस्त्यावर गटारी स्वच्छ करण्याचे काम चालू होते. साधारण तीशीच्या वयातील इसम गटारीत उतरलेले, हाताखाली कामास असणाऱ्या स्त्रियांकडे गटारीतील वाळू,सडलेला कचरा, आणि घनकचऱ्याच्या पाट्या देत तो कचरा रस्त्याच्याकडेला एका ठिकाणी जमा करत होते. एकूणच दृश्य बघणारे लोकं तीथून जाणारे येणारे गटारीच्या दुर्गंधीने नाकाला रुमाल लावत होते,परंतु त्या तरुणांचे नाक उघडेच होते,डोके बऱ्यापैकी आत घालून महानगर पालिकेच्या गटारी साफ करत असताना त्यांना दुर्गंधीचा त्रास नसेल का होत? प्रश्न मनात येऊन गेला. 
१ मे जागतिक कामगार दिवस, ऐंशी देशांमध्ये घेतला जाणारा निर्णय,कामगारांसाठी तयार केलेली नियमावली,त्यांच्या मागण्यांचा दुजोरा आणि १ मे रोजी त्या कामगारांच्या शरीराला विश्रांती इथे मन आणि विचार यांचा उल्लेख अतिरिक्त आहे.

कामगार :- कामगार म्हणजे कोण ? 
कामगार या वर्गात सगळेच येतात खाजगी धंदा असणाऱ्या व्यतिरिक्त जे लोक पोट भरण्यासाठी,पैसे कमवण्यासाठी बाहेर पडतात त्यांना कामगार म्हणतात,त्या कामगारांचे विभाजन त्यांच्या मिळकतीवर अवलंबून आहेत.इथे सरकारी कामगार आणि खाजगी कामगार,सरकारी कामगारांविषयी मी येथे बोलू इच्छीत नाही परंतु खासगी कामगारांच्या अनेक अडचणी, काही रोजाने तर काही वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने एका फिक्स पगारावर काम,काम किती याचा अंदाज नाही. (कदाचित गाढवांसारखे)....यासाठी सरकारचे काहीच धोरण नाहिका ?, सरकारी  कामगारांसाठी जर सरकारचे नियम आहेत तर मग खासगी कामगारांसाठी सरकारने ठेकेदार पद्धतीने त्याला किती रक्कम द्यावी असा विचार करावा. भारतात आणि परप्रांतातयामध्ये म्हणूनच तफावत दिसते, अमेरिकेत हमाल, ट्रक ड्रायव्हर, कुरियर, यांसारख्या अवघड जास्त कष्ट लागण्याच्या कामाचा मोबदला एका क्लास वन ऑफिसर सारखा मिळतो. म्हणून तिथे रीच क्लास अँड पूअर क्लास ठरत नाही.
====================
१ मे कामगार दिन आढावा
====================
 पण भारतात जेवढे काम अवघड,जसे कचरा गाडीवर कचरा काढणारे कामगार,आपण कचरा गाडीजवळून जाताना नाकाला रुमाल लावतो कारण दुर्गंधीपासून बचाव,परंतु घरातला कचरा घ्यायला येणारे कामगार कचरा गाडीवर काम करणारे कामगार,रस्ता बनवणारे कामगार, बांधकाम करणारे कामगार,अवजड सामान उचलणारे वयस्कर कामगार, किराणा दुकानातील माल घरी पोहोचणारे कामगार यांना किती किंमत मिळते त्यांच्या कामाची ?,
यात कामाला कामाची किंमत त्याचे शरीर आहे, कचरा कोणत्याही प्रकारचा असतो त्याने त्याचा जीवाचा धोका असतो पण पोटाच्या खळगी भरण्यासाठी  सर्व काही करावे लागते. इथे अनेक कामे करताना कामगारांच्या जीवाला धोका पण होऊ शकतो. व झालाही आहे, त्यांच्या पाठीमागे त्यांचे कुटुंब असते. त्यांचा मोबदला त्यांना चांगला मिळालाच पाहिजे जर त्याचे शरीर तो त्या कामासाठी वाहून देतो आहे तर त्याला त्या कामाचा मोबदला इतका असावा की गरिबीची झालर दुर व्हावी आणि  त्याच्यावर कर्जाचा डोंगर नसावा. पौष्टिक अन्न खाऊन त्याला रात्रीची शांत निद्रा असावी. हा तरी विचार त्यांच्यासाठी करावा. शरीर जर खराब झाले तर या कामातून कमावलेला पैसा वापरून ते परत मिळवता येईल का? एवढे तरी पैसे मिळतात का? सरकारचे कोणते नियम आहेत अशा कामगारांना मोफत औषधे शरीरातील झीज भरून काढण्यासाठी  योजना असावाी इथे हे कामगार खाजगी आहेत ? खाजगी कामगार वर्ग नसताच तर अनेक कामे अधूरी पडली असती,
केवळ साजरा करण्यासाठी कामगार दिन नसावा, तर प्रत्यक्षात कामगारांच्या हिताचा निर्णय व्हावा,आणि खाजगी कामगारांकडे देखील तीतकेच लक्ष देण्यात यावे तरच खऱ्या अर्थाने कामगार दिन साजरा करण्यास अर्थ आहे,अन्यथा खाजगी कामगारांवर एकाप्रकारे अन्यायच होतो असे नाहीका शासनास वाटत ? यावर विचार मंथन होणे ही काळाची गरज आहे.अ
आजचा कामगार दिवस निमित्ताने अफाट जनसंख्या असलेला खाजगी कामगार वर्गाला आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कामगारांना उंच मानेने जगण्याच्या अपेक्षांचे स्वप्न असणाऱ्या कामगारांसह त्यांच्या कुटुंबांचे स्वप्न साकार होवोत हीच सदिच्छा.
        
    - प्रा. सुनंदा साळवे
    सुषमा पाटील उच्च माध्यमिक विभाग,नवी मुंबई (कामोठे) 
९०८२५७०४३१


close