shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेर कानडामाना सोसायटी बिनविरोध अध्यक्षपदी पंढरीनाथ शंखपाळ यांची निवड

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन ) :
 नेर कानडामाना विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाली असून, भाजपचे १२ सदस्य तर काँग्रेसच्या एका सदस्याची निवड करण्यात आली. बुधवारी (ता. २५) सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली, यात अध्यक्षपदी पंढरीनाथ शंखपाळ तर उपाध्यक्षपदी दादाभाऊ महाले यांची सर्वानुमते निवड झाली.

       नवीन संचालक मंडळ असे : गुलाबराव बोरसे, निबांजी कराड, राजेंद्र पाटील, वसंत देशमुख, वसंत सोनवणे, सुरेश सोनवणे, सुशीलाबाई सोनवणे, केसरबाई शंखपाळ, नथ्थु कोळी, मुकुंद साखरे, पांडुरंग बाविस्कर यांचा समावेश आहे. नेरचे माजी सरपंच साहेबराव सोनवणे, शंकरराव खलाणे, भाजपचे नेते गुलाबराव बोरसे यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केले. निंबाजी कराड, पंकज जैन, संजय कपूर यांचे सहकार्य मिळाले.
 याप्रसंगी, जि. प. कृषी व पशुसंवर्धन सभापती संग्राम पाटील, जी. एन. पाटील, आर. डी. माळी, गोविंद सोनवणे, गुलाब मगरे, बापू गवळे, श्री. वाघ, नामदेव बोरसे, धर्मा देवरे, जीवन मोरे आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोल एंडाईत व प्रीतेश महाले यांनी कामकाज पाहिले.
close