ओबीसी जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक,यासोबत
ओबीसींच्या विविध समस्यांबाबत जिल्हा मेळावा
राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. २८-५
ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या जिल्हा कार्यकरणीची आढावा बैठक आणि जिल्हा मेळावा श्रीरामपूर येथे ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष हाजी फैयाजभाई बागवान यांनी दिली आहे,
ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शब्बीरभाई अन्सारी हे सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात ओबीसींच्या प्रश्नासंदर्भात व समस्यांवर, विविध चर्चा संदर्भात सध्या दौरे करून मेळावे घेत आहेत, येत्या आठवड्यात ते अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून मंगळवार दि. ३१ मे २०२२ रोजी श्रीरामपूर याठिकाणी येत असून याकरीता जिल्हा कार्यकारणीतील सर्व सदस्यांची आढावा बैठक होणार आहे त्यात ओबीसी संदर्भात विविध समस्यांवर चर्चा व निवारण आणि पुढील रणनीती, नवीन सदस्य निवड तथा अशा विविध अनेक मुद्द्यांवर चर्चा होणार आहे,श्रीरामपूर येथील संगमनेर रोडवरील व्ही.आय.पी.रेस्ट हाऊस येथे मंगळवार दिनांक ३१ मे रोजी दुपारी दोन वाजता जिल्हा मेळावा घेण्यात येत आहे तरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तथा ओबीसी समाजातील सर्व मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार शौकतभाई शेख,इकबाल काकर, इब्राहीम बागवान,जाकीरभाई शाह, आरिफभाई कुरेशी,शाहिदखान पठाण,अजिज आतार,राजूभाई कुरेशी,सादिक शेख,फय्याज मुलाणी,अरिफ काकर,ॲड. हारून बागवान,अतिक तांबोळी, शरीफ शेख,शौकत शेख,उबेद बागवान आदींनी केली आहे.

