shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दहिगाव ता. माळशिरस येथे राज्यस्तरीय मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे उदघाटन.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दहिगाव ता. माळशिरस येथे राज्यस्तरीय मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे उदघाटन.
  इंदापूर प्रतिनिधी:शिवश्री प्रणव थोरात व मित्र परिवाराच्या वतीने दहिगाव ता. माळशिरस येथे राज्यस्तरीय भव्य मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित राहुन त्यांनी या मेळाव्याचे उदघाटन केले.
  हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' सध्या स्पर्धेच्या युगामध्ये अपेक्षित जीवनसाथी मिळवण्यासाठी बहुमूल्य पैसा आणि वेळ हा वाया जात आहे. मेळावा मध्ये आपल्याला अपेक्षा असणारे असंख्य बायोडाटे एकाच वेळी एकाच दिवशी बघायला मिळतात आणि वधु वर व पालक हे प्रत्यक्ष मेळाव्यामध्ये उपस्थीत असतात आणि कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये लग्न जमवण्याची प्रक्रिया सोपी होऊन जाते म्हणून मराठा समाजातील विवाह इच्छुक वधूवरांनी आणि पालकांनी वधू-वर मेळाव्यात उस्फूर्त प्रतिसाद देणे गरजेचे आहे.'
     या कार्यक्रमासाठी अर्जुनसिंह मोहिते पाटील, बी डी अण्णा पाटील, मालोजी देशमुख उपनगराध्यक्ष नातेपुते, तानाजीराव थोरात, रामचंद्र पाटील, सत्यशील पाटील, बिभीषण नलवडे, सोपान नलवडे, शरद जगदाळे व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
close