चोरांना प्रतिकार करताना वृद्ध जखमी
प्रतिनिधी :संजय वायकर
दौला वडगाव : २ / आष्टी तालुक्यातील दौलावडगाव येथील फिरोदिया कुटुंब दि . २७ एप्रिल रोजी बुधवारी पहाटे झोपेत असताना चोरांनी त्यांच्या घरात प्रवेश करून व चाकूचा धाक दाखवून घरातील सोने चांदी , रोख रक्कम, तसेच किराणा माल अशी एकूण दीड ते दोन लाखांची चोरी केली.
सविस्तर माहिती अशी कि, दौलावडगाव येथील गावात वेशीजवळ राजमल फिरोदिया हे कुटुंबासह रहात असुन रात्री झोपले असताना पहाटे चोरट्यांनी घरात प्रवेश करत चाकूचा धाक दाखवून कपाटातील रोख रक्कम अंदाजे ६० हजाराहुन अधिक, एक तोळे सोने, चांदी व किराणा मालाचे साहित्य असा दीड ते दोन लाख रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले .
यावेळी चोरांना प्रतिकार करत असताना वृद्ध राजमल फिरोदिया यांचेवर चोरांनी चाकूने हल्ला केला .त्यात ते जखमी झाले असून त्यांच्या हातावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या आहेत .
सुदैवाने त्यांचा जीव वाचला
परंतु चोर मात्र पळुन गेले .
फिरोदिया यांच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर, अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक रोहित बेंबरे, उपनिरीक्षक रवी देशमाने यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पुढील तपास सुरू केला .
मागीलवर्षी २०२१ मध्ये याच दिवशी राजमल फिरोदिया यांच्या घरी चोरी झाली होती . त्या गुन्ह्याचा तपास अजुन लागला नाही तोच पुन्हा याच दिवशी २०२२ मध्ये फिरोदिया यांचे घरी चोरी झाली . त्यामुळे अंभोरा पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे रहात आहे .
आता तरी या गुन्हेगारांचा शोध लागणार का? नाहीतर एखाद्याचा जीव गेल्यावर पोलिस जागे होतील का ? अशी उलटसुलट चर्चा येथील गावकऱ्यांमध्ये होताना दिसून येत आहे .

