प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
महावितरणच्या केज उपविभागातील साळेगाव येथे वीज वितरण विभागात प्रधान तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले रमाकांत उर्फ रमण डिकले यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशस्ती पत्रक देवून सत्कार करण्यात आला आहे.
वीज वितरण विभागात प्रधान तंत्रज्ञ असलेले रमाकांत उर्फ रमण डिकले हे त्यांच्या कामात वरिष्ठांच्या आदेशाने वीज बिल वसुली, ग्राहकांना सेवा देणे, विज वितरण बिघाड तत्काळ दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करणे. तसेच वीज चोरी रोखणे ही कामे प्रामाणिकपणे व चोख पद्धतीने करीत आहेत.
त्यांच्या या कार्याची दखल घेत १ मे महाराष्ट्र दिनी कामगार दिनाचे औचित्य साधून त्यांना लातूर येथील पुरस्कार व प्रशस्तीपत्र देवून गौरव करण्यात आला. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व अधिकारी, सहकारी मित्रमंडळी आणि गावकरी, शेतकरी, ग्राहक, ग्रामस्थ यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


