shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित खासदार गोविंदराव आदिक महाविद्यालय निरोप समारंभ व स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न..!



श्रीरामपूर ( प्रतिनिधी) :- येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित खासदार गोविंदराव आदिक महाविद्यालयात निरोप समारंभ व स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले.सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक श्री.साहेबराव घाडगे - पाटील, अध्यक्षा ऍड.सौ.सुमतीताई साहेबराव घाडगे-पाटील, उपाध्यक्षा ऍड.स्नेहलदीदी घाडगे- पाटील तसेच डॉ.अनुराधाताई गोरे यांनी प्रोत्साहन दिले.

यावेळी विद्यार्थी,शिक्षकांचे मनोगत सोबतच उत्कृष्ट रित्या सांस्कृतिक कार्यक्रमांचेही सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री दत्तात्रेय वाडेकर (सर) त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सचिन कर्डिले (सर) होते, निरोप समारंभ व स्नेह संमेलनाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्य सौ. संघमित्रा राजभोज मॅडम यांनी केले,कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. सचिन कर्डिले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे बी.ए. एल.एल.बी. चतुर्थ वर्ष च्या विद्यार्थिनी भावना मुंडे व सानिया सय्यद यांनी केले.विद्यार्थी विकास अधिकारी, प्राध्यापक ज्योती शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .द्वितीय वर्षाचे अक्षय कुसळकर,अजित दंडवते, धनंजय कांदळकर व विशाल ढाकणे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले, शुभम भराडी विषाल मुसमाडे, विकास जगधने, फरहान शेख, दिव्या अकोलकर स्मृति बॉम्बे, मोना पंडित, प्रवीण भावसार,आकाश बांधले, पल्लवी बोरवे आदींनी उत्कृष्टपणे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्राध्यापिका अशा कबड्डी मॅडम यांनी केले, कार्यक्रमास ऍड ‌ अर्चना झेंडे,ऍड. नंदिनी मुळे,ऍड. मानसी करंदीकर श्री.वानखडे सर, श्री. जाधव सर, श्री. निकाळजे सर, कार्यालयीन कर्मचारी राजश्री होली, प्रतिक्षा काळे ,गौरी शेलार ,आनिता सुपेकर, संगीता केदार इत्यादी उपस्थित होते.

या कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थीनी समवेत शिक्षक, प्राध्यापक,त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे सर्व कर्मचारी वृंद हे उपस्थित होते.
close