शिर्डी । जामा मस्जिद ट्रस्ट ची बातमी वाचली... बातमी वाचून कधी डोळ्यात पाणी आलेल आठवतं नाही पण काल तसं घडले.. ट्रस्ट च्या सभासदांनी जो मनाचा मोठेपणा दाखवला भोंग्यावर अजान होणार नाही पण साई बाबांची आरती भोंग्यावर सुरू ठेवा. या साठी निवेदन देणे खूप मोठे मन लागतं त्या साठी... यांचा सत्कार होईलाच हवा.. या भावनेने फेसबुक वरून साद घातली सगळ्यांना माहीत आहे.
राज्याच्या कानाकोपऱ्यात माझे भाऊ आहेत.. Djkiran More म्हणाले ताई मी शिर्डी चा आहे..या दादाने साद घातली.दादा च माझं या संदर्भात बोलणें झाले.. माझ्या शब्दाला मान देऊन दादा व त्यांचे सहकारी,सोमनाथ लकारे,तेजस पगारे,विक्रम मासाळ, शशीकांत पाटील यांनी साई बाबांच्या नावाची शाल व पुष्पगुच्छ देऊन जामा मस्जिद ट्रस्ट चे उपाध्यक्ष बाबाभाई सय्यद यांचा सत्कार केला आहे.! हा विषय देशाला एक प्रेरणादायी विषय आहे.
किरण दादा मोरे व त्यांच्या सहकार्यांचे खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जामा मस्जिद ट्रस्ट यांचे खूप खूप आभार🙏

