आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे आज 17 मे जागतिक उच्च रक्तदाब दिन साजरा करतांना या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
उच्च रक्तदाब हा आजार पूर्वी वृद्धांचा आजार समजला जायचा परंतु धावपळीच्या जीवनात आज पंचविसीत देखील हा आजार अनेकांना आपले शिकार बनवतो.या आजाराची लक्षणे चोर पावलाने हळू येत असल्याने लक्षात येत नाहीत. म्हूणन या आजाराला सायलंट किलर आजार म्हूणन देखील ओळखले जाते.
उच्च रक्तदाब हे स्ट्रोक,हृदयविकाराचा झटका व मूत्रपिंडाचे गंबीर आजारचे मूळ ठरू शकते.जंक फूडचे अतीप्रमाणात सेवन,व्यायामाचा अभाव,बैठे काम,मद्यपान,तंभाकूचे सेवन,आहारात जास्त प्रमाणात मिटाचा वापर अशा अनेक कारणामुळे रक्तदाब होऊ शकतो.
रक्तदाबची वाढती व्याप्ती लक्षात घेता आज प्रत्येकाने वयाच्या तिशीनंतर वर्षातून एकदा रक्तदाब तपासून घेणे गरजेचे आहे.
आहारात फळे,भाज्या,मोड आलेले कडधान्य,याचा समावेश करून सकस आहार घेऊन जीवनात नियमित व्यायामाला स्थान देऊन मद्यपानापासून दूर राहिल्यास आपण या आजारापासून दूर राहू शकतो.
दरवर्षी 17 मे जागतिक उच्च रक्तदाब दिन म्हूणन साजरा केला जातो. या *सायलंट किलर आजाराबाबत लोकांना जागरूक करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे
जागतिक रक्तदाब दिन-2022 ची थीम " तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा,नियंत्रित करा,दीर्घायुष्य जगा " ही असून या आजाराबाबत वेळीच निदान व उपचार घेतल्यास या आजाराला आपण दूर ठेऊ शकतो.उच्च रक्तदाब या आजाराबाबत मार्गदर्शन करतांना वरील सर्व मुद्धे संस्थेचे प्राचार्य मा.डॉ.डवले सर व वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.बनसोड यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शन पर भाषणातून स्पष्ट केले.
वरील कार्यक्रमाला आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य मा.डॉ.डवले सर, मा.वैद्यकीय अधिकारी बनसोड सर, वैद्यकीय,पर्यवेक्षक मा.श्री.डोंगरे सर,देशमुख सर व सातपुते सर उपस्थित होते.

