shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी..!

शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन) :-
 क्रांतीसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते. समाजात समानता न्याय बंधुता अधिमूल्य रुजविण्यात महात्मा बसवेश्वर यांचे खूप मोठे योगदान आहे सर्व जाती धर्मातील लोकांना यांनी समानतेची प्रेमाची बंधुत्वाची शिकवण दिली. त्यांची जयंती भारतात सर्वत्र शासकीय निमशासकीय कार्यालय महामंडळ आदी ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.

 शिर्डी नगर परिषद येथे महात्मा बसवेश्वर यांची ८९१ वि जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मा.नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर व मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून वंदन केले. 

यावेळी नगरसेवक सचिन चौगुले, नगरसेवक सुरेश आरणे, प्राचार्य विकास शिवगजे सर, दीपक साखरे सर, प्रदीपजी वैद्य, जयेशजी बोबडे, सुभाष याद गुडे, विजय कुमार, फोलाने नागेशवर डोळे, सोपान घोडके, मनोज बोरखडे, मुकुंद तडके, योगेश बोबडे, तुकाराम वास्ते, बसवराज तंबकदवार, अण्णा अनुने, वरद बोबडे,मयुरेश बोबडे, शंकर आण्णा बिडकर, अंजलीताई कोते, रविंद्र सोनवणे, ग्रंथपाल शिर्डी नगर परिषद आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदीपजी वैद्य यांनी मानले.
close