shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सौ शुभांगी निरगुडेंचा महाविद्यालयात प्रथम क्रमांक, ठरल्या आहेत विद्यापीठात सुवर्णपदकाच्याही मानकरी


शिर्डी । प्रतिनिधी: - शैक्षणिक क्षेत्रात यश मिळविल्याबद्दल  सौ. शुभांगी निरगुडे यांचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन होत आहे,मिळालेल्या माहिती नुसार सावळीविहीर बुद्रुक येथील मधुकर बाबुराव लोंढे पाटील यांच्या सुकन्या सौ. शुभांगी निरगुडे यांना कराड येथील शासकीय औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच विद्यापीठ सुवर्णपदकाचे मानकरी ठरलेल्या आहे GPAT परीक्षेत उत्तीर्ण होऊन उच्च शिक्षणासाठी त्या पात्र देखील ठरल्या आहेत.

 त्यांच्या या यशामुळे त्यांना महाराष्ट्र राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व विद्यमान आमदार राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे  खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील, राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब जपे ,प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ. रुपालीताई संतोष आगलावे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दूनबळे,सर्व ग्रामपंचायत सदस्य न्यू इंग्लिश स्कूल सावळीविहीर स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य मुख्याध्यापक व शिक्षक वृंद जनसेवा पॅनलचे पदाधिकारी व सर्व सहकारी मित्रमंडळ यांचे वतीने सौ. शुभांगीताईस या शैक्षणिक यशाबद्दल खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
close