शिर्डी । प्रतिनिधी :- राष्ट्रीय स्तर तायक्वांदो मध्ये मुली आणि मुलांचा अप्रतिम खेळ दि.१३ ते १६ मे २०२२ या कालावधीत मध्य प्रदेश (एम.पी.) च्या उज्जैन शहरात संपन्न झाला .
वसई विरार येथील पालघर तायक्वांदो असोसिएशनच्या खेळाडूंनी अनेक पदक मिळवून आपला पालघर जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याचा मान वाढवला,के कॉर्पस इंडिया तायक्वांदो अकॅडमी मध्ये खेळाडूंना रीतसर ट्रेंनिंग देवून त्यांना या खेळासाठी तयारी केली आणि ३ रजत पदक व १ कांस्य पदक मिळवून घवघवीत यश प्राप्त केले.
या खेळात देशभरातील २५ राज्यांनी आपला सहभाग नोंदवला होता,पदक विजेताउत्कर्ष मितेश मोदी रजत पदक,पहल देसाई रजत पदक, सूची सरोज रजत पदक, साहिल पाटील रजत पदक,भाग घेतलेले खेळाडू वर्धमान मितेश मोदी, कुणाल हिरेन मोदी, दिक्षा शेट्टी ऋषब देसाई, माधव सिवालाल, क्रिशिव प्रजापती,तसेच या टीमचे मुख्य प्रशिक्षक सैफअली मलिक,सूची सरोज यांचे विशेष सहयोग प्राप्त झाले.या यशाबद्दल वसई - विरारचे लोकप्रिय आमदार हितेंद्र ठाकूर,आमदार क्षितीज ठाकूर, माजी महापौर नारायण मानकर, संदेश जाधव,उमा पाटील युवा विकास आघाडी टीम वॉर्ड ९७ राजेंद्र कांबळी,श्रीमती निभा मितेश मोदी ,राजा मकवणा आणि टीम तथा आदिंनी अभिनंदन केले आहे.

