इंदापूर तालुका स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्यावतीने नूतन गटशिक्षण अधिकारी अजिंक्य खरात यांचे स्वागत करून सत्कार
इंदापूर प्रतिनिधी: प्रभारी गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांची पुणे जि.प.येथे बदली झाली.बामणे यांनी ४ वर्षे इंदापूरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून खूप चांगले काम केले.
नुकतेच अजिंक्य खरात यांनी हे नूतन गटशिक्षणाधिकारी म्हणून इंदापूरचा पदभार घेतल्यानंतर इंदापूर तालुका स्वाभिमानी शिक्षक परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
इंदापूर तालुक्याचा जो शैक्षणिक दर्जा आहे,त्यामुळे तालुक्याचे नाव राज्यभर आहे.ते नाव कायम टिकविण्यासाठी सर्व शिक्षकांनी कार्यशिल रहावे,असे आवाहन नूतन गटशिक्षणाधिकारी आजिंक्य खरात यांनी संघटनेच्या पदाधिका-यांना केले. तसेच शिक्षकांना कोणत्याही कामासाठी कार्यालयात हेलपाटे मारावे लागणार नाहीत,असे पदाधिका-यांना सांगितले .
यावेळी यावेळी शिक्षक संघाचे अध्यक्ष नानासाहेब नरुटे,शिक्षक पतसंस्था चेअरमन आदिनाथ धायगुडे,मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुहास मोरे,इब्टा संघटनेचे अध्यक्ष सहदेव शिंदे,शिक्षक भारतीचे अध्यक्ष सतिष शिंदे,शिक्षक नेते दत्तात्रय तोरसकर,सुरेश पांढरे तसेच शिक्षक पतसंस्थेचे संचालक भारत बांडे,संजय म्हस्के,सतिष गावडे, संतोष तरंगे,प्रशांत घुले,सचिन देवडे,संतोष गदादे,सचिव प्रशांत भिसे,शेखर मिसाळ,पर्वती रुपनवर,राजेंद्र भोंग,आंबादास नरुटे,रामदास पांडुळे,विनोद नरुटे,राजकुमार तरंगे आदी शिक्षक उपस्थित होते.

